Malav 
सोलापूर

जिल्ह्यातील कलाशिक्षकाने रोवला झेंडा ! मलाव यांच्या चित्रांचा नववीच्या अभ्यासक्रमात समावेश 

श्रावण तीर्थे

कोरवली (सोलापूर) : मोहोळ तालुक्‍यातील कामती खुर्द लमाणतांडा येथील श्री परमेश्वर आश्रमशाळेतील कलाशिक्षक सुरेश भागवत मलाव यांच्या चित्रांचा समावेश महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता नववीसाठीच्या चित्रकला व रंगकाम या कार्यपुस्तिकेत 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून केला आहे. पाठ्यपुस्तक महामंडळाने दिलेल्या विविध घटकांवर विद्यार्थ्यांना सहजरीत्या समजतील अशा सहजपणे परंतु वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षकरीत्या चित्रे काढून दिल्याने कलाशिक्षक श्री. मलाव यांच्या चित्रांची निवड करण्यात आली आणि त्याचा नववीच्या पुस्तकात समावेश झाला असल्याचे सुरेश मलाव यांनी सांगितले. 

मलाव यांनी 1992 मध्ये कला पदविका परीक्षा सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने पटकावली आहे. त्याच वर्षी लमाणतांडा येथील श्री परमेश्वर आश्रमशाळेत कलाशिक्षक म्हणून ते कार्यरत झाले. जवळपास 28 वर्षे कलाशिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. ते दरवर्षी आपल्या शाळेत विविध प्रकारचे उपक्रम राबवीत असतात. त्यांनी स्वतः प्रकाशित केलेले ग्रेड परीक्षा संकल्प चित्र या पुस्तकाची पाचवी आवृत्ती प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची पुस्तके पोचली आहेत. 

जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी 2013 मध्ये गुणवंत कलाध्यापक म्हणून श्री. मलाव यांचा गौरव केला आहे. तसेच लोकमंगल शिक्षकरत्न पुरस्कार, महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळाचा राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक तसेच जिल्हास्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कारही त्यांना यापूर्वी मिळाले आहेत. 

यापूर्वी त्यांनी बालभारती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळावर कला विषयाच्या हस्तपुस्तिकेसाठी समीक्षक म्हणून काम केले आहे. 2008 मध्ये इयत्ता आठवीसाठी बालभारतीमध्ये कला हस्त पुस्तिकेसाठी समीक्षणोत्तर संपादकीय म्हणून काम केले आहे. कलाशिक्षक मलाव हे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी दीपावलीनिमित्त विविध प्रकारचे आकाश कंदील तयार करायला शिकवतात. त्यांनी श्री परमेश्वर आश्रमशाळेतील भिंतींवर काढलेली विविध आशयाची वैशिष्ट्यपूर्ण चित्रे विद्यार्थी, पालक व कला रसिकांना आकर्षित करून घेतात. 

मलाव यांच्या चित्रांचा पाठ्यपुस्तकात समावेश झाल्याने समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे, आश्रमशाळेचे अध्यक्ष चंद्रकांत देशमुख, मुख्याध्यापक जब्बार शेख, संचालक रामभाऊ दुधाळ, बाळासाहेब डुबे पाटील, प्रशांत पाटील, तायाप्पा पुजारी, ताजोद्दीन शेख व शिक्षक वृंद यांनी कौतुक केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHT 2025-26: काव्या मारनची परफेक्ट चॉईस! 30 लाखाच्या गोलंदाजाने भल्याभल्यांना नाचवले; IPL 2026 नक्कीच गाजवणार

फॉरेनर बायकोचा हट्ट पडलेला बॉलिवूड अभिनेत्याला महागात; परदेशी स्त्रीसोबतच्या लिव्ह इनने झाला पश्चाताप

Latest Maharashtra News Updates Live: राज ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत, शिवसेनेच्या प्रकाश महाजन यांची टीका

Dharashiv News : इमारत तयार, पण सुविधा अद्याप बंद; येरमाळ्यात शासकीय विश्रामगृह ३ वर्षांपासून लोकार्पणाविना!

Jalgaon Municipal Election : जळगावचा 'पहिला नागरिक' कोण? महापौर आरक्षणाची टांगती तलवार, उमेदवारांच्या काळजाची धडधड वाढली

SCROLL FOR NEXT