Sugar Factory 
सोलापूर

साखर कारखाने सुरू करण्यासाठी नियोजन करा; पालकमंत्री भरणे यांच्या सूचना 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिल्या. जिल्ह्यातील शेती, पाऊस, खते आणि पीक कर्ज वाटप याबाबतचा आढावा श्री. भरणे यांनी आज घेतला. त्या वेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाला या सूचना दिल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार आदी उपस्थित होते. 

बैठकीच्या प्रारंभी श्री. बिराजदार यांनी जिल्ह्यातील पाऊस, खरिपाच्या पेरण्या, खतांची उपलब्धता याबाबत माहिती दिली. चांगला पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत सरासरीपेक्षा जास्त पेरण्या झाल्या आहेत. सरासरी पेरणी क्षेत्र सुमारे दोन लाख 34 हजार हेक्‍टर आहे. मात्र या वेळेला आतापर्यंत तीन लाख 68 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे, असे त्यांनी सांगितले. 

यावर उसाखालील क्षेत्र पाहता साखर कारखाने सुरू करण्याचे नियोजन करा. यासाठी जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, प्रादेशिक साखर सहसंचालक, सहकार विभाग यांनी एकत्रित नियोजन करावे. ज्या साखर कारखान्यांसमोर समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जावेत, असे श्री. भरणे यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना खतांची उपलब्धता वेळेत होईल याकडे लक्ष द्या. पीककर्ज वाटपाला गती द्या. राष्ट्रीयकृत बॅंकांचे कर्ज वाटप कमी झाले आहे, त्यांची बैठक घेऊन पीककर्ज वाटप वाढेल यासाठी प्रयत्न करा, असेही त्यांनी सांगितले. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी महसूल आणि पोलिस विभागाने एकत्रित प्रयत्न करावेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक वाढविण्यासाठी प्रयत्न करा, असेही श्री. भरणे यांनी सांगितले. 

बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त पंकज जावळे, जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे, सरव्यवस्थापक किसन मोटे, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक प्रशांत नाशिककर, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, कृषी उपसंचालक रवींद्र माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT