zillha-parishd-solapur_201911326872 (2).jpg 
सोलापूर

पोषण आहारातून चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ ! झेडपी सदस्य धाईंजेंचा आत्मदहनाचा इशारा अन्‌ सीईओंनी काढली दोन पत्रे

तात्या लांडगे

सोलापूर : खुल्या पोषण आहारातील भ्रष्टाचाराची नियुक्‍त चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वीच व दोषींवर कारवाई न करताच बिले वितरीत करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्याविरोधात जिल्हा परिषदेचे सदस्य त्रिभुवन धाईंजे यांनी उद्या (बुधवारी) आत्मदहन करीत असल्याचे निवेदन एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्‍त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर सीईओंनी याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असून त्यानंतरच बिल अदा केले जाईल. तत्पूर्वी, आपण आत्मदहनासारखे पाऊल उचलू नये, अशी विनंती केली आहे.

सीईओंनी तत्काळ काढली दोन पत्रे
जिल्हा परिषद सदस्य धाईंजे यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दोन पत्रे काढली. पहिल्या पत्रानुसार त्यांनी संबंधित संस्थेला दिले जाणारे पोषण आहाराचे बिल चौकशी अहवाल प्राप्त होईपर्यंत थांबवावे आणि याबाबत आपल्या स्तरावरून तत्काळ मागर्दशन करावे, अशी विनंती एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्‍तांना लिहिले आहे. तर दुसऱ्या पत्रानुसार त्यांनी धाईंजे यांना आत्मदहन करू नये, अशी विनंती केली आहे. 

कोरोना काळात चिमुकल्यांना खुला पोषण आहार वितरीत करण्यात आला. त्यावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेक सदस्यांनी आहार वाटपात भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर झेडपीच्या स्थायी समितीने चौकशी समिती नियुक्‍त केली. मे-जून 2020 पासून पोषण आहार निकृष्ट दर्जाचा दिला जात असल्याचे धाईंजे यांचे म्हणणे आहे. सहा महिन्यांपासून या प्रकरणाची चौकशीच सुरु आहे. चौकशी पूर्ण झालेली नसताना मात्र, संबंधित संस्थेला बिल देण्याची घाई प्रशासनाकडून केली जात असल्याचा आरोप त्यांनी निवेदनातून केला आहे. या प्रकरणी एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्‍त इंद्रा मालो यांनी शासन निर्णयावर बोट ठेवले असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आयुक्‍तांकडे बोट दाखविले आहे. त्यामुळे आपण या गोष्टीचा निषेध करीत असल्याचे म्हणत संबंधित संस्थेला बिल देणे थांबवावे, अन्यथा आत्मदहन करू. त्यानंतर होणाऱ्या नुकसानीला आयुक्‍त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदार असतील, असेही धाईंजे यांनी पत्रात नमूद केले आहे. त्याची एक प्रत त्यांनी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही पाठविली आहे. या पार्श्‍वभूमीवर आयुक्‍तांनी धाईंजे यांना विनंती पत्र लिहून आत्मदहन करू नये, अशी विनंती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT