PM Modi Solapur Connection 
सोलापूर

PM Modi Solapur Connection : ...पण त्यांनी मला उपाशी झोपू दिलं नाही; पीएम मोदींनी सांगितलं सोलापूर खास कनेक्शन

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या सोलापूरशी असलेल्या खास नात्याविषयी माहिती दिली आहे. आजही सोलापूर माझ्या हृदयात वसलेलं आहे असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

रोहित कणसे

PM Modi Solapur Connection : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या विकासकामाचे लोकर्पण आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या सोलापूरशी असलेल्या खास नात्याविषयी माहिती दिली आहे. आजही सोलापूर माझ्या हृदयात वसलेलं आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, सोलापूर जसे श्रमिकांचे शहर आहे तसेच माझे कार्यक्षेत्र असलेले अहमदाबाद देखील श्रमिकांचे शहर आहे. तेही टेक्सटाइल श्रमिकांचे शहर आहे. अहमदाबाद आणि सोलापूरचे इतक्या जवळचे नाते आहे. माझे आणि सोलापूरचे तर त्याहूनही जवळचे नाते आहे. माझ्या अहमदाबादमध्ये खूप पद्मशाली कुटुंबे राहतात.

माझ्या पुर्वाश्रमी, माझं सौभाग्य होतं की, महिन्यात तीन-चार वेळा आपले पद्मशाली कुटुंबे मला जेवण देत असत. ते छोट्या चाळीत राहायचे. तीन लोकांना बसयला देखील जागा नसायची. पण त्यांनी मला कधी उपाशी झोपू दिलं नाही. मला आश्चर्य वाटलं, खूप वर्षांपूर्वी एका दिवशी सोलापूरच्या एका व्यक्तीने मला विणलेलं एक सुंदर चित्र पाठवलं होतं. आजही सोलापूर माझ्या हृदयात वसलेलं आहे असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्राधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, देशभरात फुटपाथवर लहान-मोठी कामे करणाऱ्या, खेळणी, फुले, भाजीपाला विक्रेते अशा लाखो लोकांना कोणी विचारले नाही. पण अशा लोकांची मोदीने पूजा केली. आज मोदीने पहिल्यांदा या लोकांची मदत केली आहे. या लोकांना जास्त व्याज देऊन कर्ज घ्यावे लागत होते. कारण यांच्याकडे बँकेला देण्यासाठी गॅरंटी नव्हती. आज कोणत्याही गॅरंटीशिवाय अशा लोकांना बँकेकडून कर्ज मिळत आहे. अशा लोकांना हजारो कोटी रुपायांची मदत देण्यात आली आहे.

सोलापूर हे उद्योगांचे, मेहनती कामगारांचे शहर आहे. येथे छोट्या आणि लघु उद्योगांशी लाखो लोक जोडलेले गेले आहेत. सोलापूरच्या कापड उद्योगाची ओळख देश आणि जगभरात आहे. सोलापुरी चादरीबद्दल सर्वांना माहिती आहे. देशात युनिफॉर्म बनवणारं सर्वात मोठं क्लस्टर सोलापूरात आहे. मला सांगण्यात आलं की, विदेशातून देखील युनिफॉर्म बनवण्याच्या मोठ्या ऑर्डर येथे येतात.

मोदींचे जॅकेट सोलापूरहून जातात

कपडे शिवण्याचे काम अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. पिढ्या बदलल्या, फॅशन बदलली पण कोणी कपडे शिवणाऱ्यांचा कधी विचार केला का? मी त्यांना विश्वकर्मा साथी समजतो आणि त्यांचं जीवन बदलण्यासाठी आम्ही 'पीएम विश्वकर्मा योजना' बनवली आहे. तुम्ही बऱ्याचदा माझ जॅकेट बघितले असतील. त्यापैकी काही जॅकेट हे सोलापूरहूनएक साथी बनवून पाठवतो. मी नकार दिल्यानंतर देखील तो पाठवतो. एकदा मी फोनकरून त्याला सुनावलं देखील की पाठवू नको म्हणून असेही पीएम मोदी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शब्द उधार घेतो, लाव रे तो व्हिडीओ! फडणवीसांनी ठाकरे बंधूंना त्यांच्याच व्हिडीओतून दिलं उत्तर, ३ मिनिटांचा VIDEO दाखवला

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात ऐन हिवाळ्यात पावसाच्या जोरदार सरी, कमी दाबाचा पट्टा

यंदा शाळांना ४५ दिवसांची उन्हाळा सुट्टी! जानेवारी ते जूनपर्यंत ७६ दिवस विद्यार्थ्यांना सुट्ट्या; एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात अंतिम सत्र परीक्षा

Satara News: एसटीतील सुट्या पैशांच्‍या वादाला ब्रेक; यूपीआय पेमेंटद्वारे तिकिटे काढण्‍यास प्रतिसाद, पारदर्शकतेतही वाढ!

घरकूल लाभार्थींसाठी मोठी बातमी! घरकुलावर सौर संच बसवायला मिळणार ‘CSR’ फंड; लाभार्थींना बॅंकेतूनही घेता येणार कर्ज; घरकूल लाभार्थींना २.१० लाख अनुदान

SCROLL FOR NEXT