pm narendra modi in solapur for ray nagar project along with cm eknath shinde ajit pawar devendra fadnavis Sakal
सोलापूर

पंतप्रधान उद्या 60 मिनिटे सोलापुरात! CM, DCM, उच्च शिक्षण, गृहनिर्माण मंत्र्यांसह राज्यपालही येणार

प्रोटोकॉल प्रमाणे त्याशिवाय कोणीही स्टेजवर किंवा स्वागतासाठी नसणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : येथील रे नगर प्रकल्पातील १५ हजार घरांच्या लोकार्पणासाठी उद्या (शुक्रवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत.

पंतप्रधान हेलिपॅडवर आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री, मुख्य सचिव, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी,

विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्यासह पक्षाचे काही पदाधिकारी उपस्थित असतील. प्रोटोकॉल प्रमाणे त्याशिवाय कोणीही स्टेजवर किंवा स्वागतासाठी नसणार आहे.

व्यासपीठाजवळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, म्हाडाचे अधिकाऱ्यांसह इतर महत्त्वाचे प्रमुख अधिकारी उपस्थित असणार आहेत. पंतप्रधानांचा दौरा आता ८५ मिनिटांऐवजी ६० मिनिटांचाच राहील, अशी माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे. जिल्हा प्रशासन व पोलिसांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याचे सुक्ष्म नियोजन केले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी सहा हेलिपॅड तयार करण्यात आले असून त्यात पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासाठी एक हेलिपॅड आहे.

स्टेजवर पंतप्रधानांसोबत असणार हे मंत्री, लोकप्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृह निर्माणमंत्री अतुल सावे, मुख्य सचिव नितीन करीर, प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम, रे नगर फेडरेशनचे युसूफ शेख, नलिनी कलबुर्गी हे पंतप्रधानांसोबत व्यासपीठावर असणार आहेत.

त्याशिवाय कुंभारी कार्यक्षेत्राचे आमदार व खासदार आणि मागील डायसवर जिल्ह्यातील इतर खासदार, आमदार व शिवसेना (एकनाथ शिंदे गट), भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष यांचीही व्यवस्था करण्याचे नियोजित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT