The Police action at liquor den in Pandharpur taluka 
सोलापूर

आठ दिवसात पुन्हा हातभट्टी दारुचा अड्डा सुरु; पोलिसांची पुन्हा कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : सोनके (ता. पंढरपूर) येथे सुरू असलेली अवैध्यरित्या हातभट्टी दारू अड्यावर धाड टाकून हजारो रूपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. देशात कोरोनाचे संकट असताना. आठ दिवसात पुन्हा हातभट्टी दारू भट्टी सुरू केली होती.
कोरोनाच्या महामारीवर देश मात करीत असताना, सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र दारू बंद आहे.

कडक प्रशासकीय अधिकारी वर्गामुळे ही भट्टी दुसऱ्या वेळेस फोडून पर्दाफाश करण्यात आला. यावेळी पोलिस उपविभागिय अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. पहिले तीन संशयित आरोपी सुटले नसताना पुन्हा भट्टी सुरू केली होती. संशयित आरोपी अमोल दीघे (सोनके), दिलिप गायकवाड (पळशी), मोहन दिघे (सोनके), बापू गायकवाड यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एक संशयित आरोपी घटनास्थळी सापडला असुन तीघे फरार आहेत. संशयित आरोपी भट्टीवर गुळ मिश्रीत रसायने तयार करून दारू तयार करित होते. घटनास्थळी गुळमिश्रीत रसायन, बँटरी सेल, इलेक्ट्रिक मोटार, वायर, पाईप, युरीया, नवसागर, झाडाची साल, टुब, बँलर, २२०० लीटर रसायन असे रसायन नष्ट करण्यात आले तर ७००० हजार रूपये किमंतीचे साहित्य ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपी एमएसइबीच्या खांबावरून चोरून लाईट घेवून दारू काढत होते. संशयित आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खुप दिवसापासुन सुरू असलेली दारू भट्टी उधवस्त केल्याने सोनकेतील महिलांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC : एमपीएससीच्या मुलाखती पुढे ढकलल्या; पात्र उमेदवारांवर मोठा अन्याय

Traffic Challan: कारमध्ये गाणं वाजवलं तर लागणार मोठा दंड, गाडी जप्तही होऊ शकते; काय आहे नियम?

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Vishwa Shanti Yatra : आंतरिक शांतीतून विश्वशांती; अभूतपूर्व 'विश्व शांती यात्रा २०२६'चे आयोजन

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

SCROLL FOR NEXT