police.jpg 
सोलापूर

बाजारातील गर्दीच्या कारणावरून पोलिस पुन्हा आक्रमक

सकाळ वृत्तसेवा

सोलापूरः शहरात बाजारपेठ उघडल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच ग्राहकांची वाढलेली गर्दी व सोशल डिस्टन्सिंगच्या शिस्तीचे पालन होत नसल्याने मोठ्या अडचणी उद्‌भवल्या आहेत. या गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिस व प्रशासनाला पुन्हा कारवाई मोहीम सुरू करण्याची वेळ आली आहे. 

हेही वाचाः चेस द व्हायरस.... 

शहरात शुक्रवार (ता. 5)पासून बाजारपेठ सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. नेमकी कोणती दुकाने उघडावीत, याचे नियोजन केले गेले. मनपा व जिल्हा प्रशासनाने सम-विषम तारखेनुसार दुकाने सुरू करण्याच्या दृष्टीने व्यापाऱ्यांशी संवाद साधून या सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानंतर प्रत्यक्षात बाजारपेठ सुरू झाल्यानंतर अनेक भागात ग्राहकांची मोठी गर्दी रस्त्यावर झाली. 

किराणा व औषधी दुकाने पूर्वीपासून सुरू होती. मात्र मोबाईल दुरुस्ती, कापड दुकान, जनरल स्टोअर्स, भांडी व इतर दुकानांबाबत मात्र परिस्थिती वेगळी होती. दोन महिन्यांपासून या दुकानांचे व्यवहार पूर्णपणे बंद होते. या दुकानांसंबंधित कामे शिल्लक राहिल्याने नागरिकांचा मोठ्या संख्येने मोर्चा या दुकानांकडे वळला होता. काही ग्राहकांनी पहिल्या दिवशी गर्दी होईल म्हणून दुकांनाकडे जाणे टाळले. मात्र शनिवारी (ता. 6) बाजारात अधिक गर्दी झाली. 
कुठेच सोशल डिस्टन्सचे तत्त्व पाळले गेले नाही. तेव्हा ही स्थिती पाहून पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला. 
पूर्वभागातील बाजारामध्ये पोलिसांनी वाहनचालक व पायी जाणाऱ्या ग्राहकांना रोखून गर्दी करण्यावरून कारवाई केली. नवी पेठ भागात देखील मोबाईल दुकानाच्या ठिकाणी गर्दी झाल्याने हीच अडचण झाली. 
त्यानंतर आज तातडीने नवीपेठ भागातील व्यापाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली. त्यामध्ये वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाययोजना निश्‍चित करण्यात आल्या. एक तर रस्त्यावर दुचाकींसाठी बंद दुकानासमोर पार्किंग करावी. केवळ पायी चालणाऱ्या ग्राहकाला रांगेने सोडावे. कॉडलेस माईकचा वापर करून सोशल डिस्टन्सिंगच्या सूचना देण्यात आल्या. बाजारात आलेल्या ग्राहकांसाठी सॅनिटायझर व स्प्रेचा वापर करण्याचे ठरवण्यात आले. तसेच सुरक्षारक्षकांना देखील शिस्त लावण्याच्या कामाला लावले जाणार आहे. इतर व्यापाऱ्यांच्या दुकानांत ग्राहकांची संख्या गर्दी करण्याइतकी नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले. 

सोशल डिस्टन्सचा नियम पाळून बाजारात खरेदी
नवी पेठ भागात दुचाकी बाजारपेठेच्या बाहेर किंवा पार्किंगमध्ये लावण्यात येतील. ग्राहकांना केवळ सोशल डिस्टन्सचा नियम पाळून बाजारात खरेदीला ये-जा करण्याची सोय केली जाईल. दोन दिवसांचा अनुभव पाहून काही नवीन निर्णय घेतले आहेत. 
- अशोक मुळीक, अध्यक्ष, नवी पेठ व्यापारी संघटना  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Women Cricket: क्रिकेटमधील महिलांचा उत्साह दुपटीने वाढला; भारतातील १४ राज्यांचा सर्व्हे, युवा खेळाडूंची पावले सरसावली

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

SCROLL FOR NEXT