Police beat during blockade in Solapur 
सोलापूर

आईची औषधे आणण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यालाच बसले फटके!

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : आजारी आईची औषधे आणण्यासाठी मेडिकलला निघालेल्या पोलिस कर्मचारी हरिकृष्ण चोरमुले यांना नाकाबंदीमध्ये असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी मारहाण केली. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास होटगी स्टेशन परिसरात घडली.
पोलिस शिपाई चोरमुले हे सोलापूर शहर पोलिस मुख्यालयालात सेवेत आहेत. रविवारी त्यांची साप्ताहिक सुटी होती. त्यांची आई होटगी स्टेशन येथे राहण्यास आहे. चोरमुले हे आईला भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर आईच्या आजारपणाची औषधे आणण्यासाठी पोलिस कर्मचारी चोरमले हे शहराच्या दिशेने दुचाकीवरून येत होते. त्यावेळी होटगी स्टेशन येथे नाकाबंदीला असलेले पोलिस उपअधीक्षक संतोष गायकवाड यांनी काहीच चौकशी न करता थेट मारहाण केली, असे चोरमुले यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात वळसंग पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यानंतर चोरमुले यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना फोन करून घटनेची माहिती कळवली. तसेच शहर पोलि नियंत्रण कक्षाला याबाबतची कल्पना दिली. त्यानंतर ते उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाले. याबाबत पोलिस उपअधीक्षक गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तसे काही झाले नाही, असे सांगून अधिक बोलणे टाळले. कोरोना व्हायरस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे ७२ तास महत्वाचे, कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

Ayodhya Food: अयोध्या स्टाईल ब्रेकफास्ट करायचाय? राम मंदिर दर्शनानंतर या ठिकाणी फूड लव्हर्स नक्की जातात; कारण आहे 'महावीर टिक्की'

Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT