Police give Punishment to vehicle in Barshi city and taluka 
सोलापूर

बार्शी शहर व तालुक्‍यात पोलिसांचा दंडात्मक कारवाईचा बडगा 

सकाळ वृत्तसेवा

बार्शी (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बार्शी शहर व तालुक्‍यात वाहनधारकांकडून पोलिसांनी दोन दिवसात 75 हजार रुपये दंड वसूल केला आहे. 
बार्शी शहरात लॉकडाउन जाहीर करावा तसेच राजकीय, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन शहरातील वाढलेला संसर्ग कमी होण्यास मदत होईल, अशी मागणी विविध संघटनांनी केली होती. त्यानुसार बैठक पार पडली होती. या बैठकीत आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार दिलीप सोपल, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनी विचार व्यक्त केले. त्यानंतर लॉकडाउन ऐवजी सर्वांनी काटेकोरपणे नियम पाळावेत, आठ दिवसांनी पाहू व कारवाई करू असे ठरले. त्यानुसार पोलिस यंत्रणेने काटेकोरपणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करून कारवाई सुरू केली असून नागरिकांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. दोन दिवसात मास्क न वापरणाऱ्या 110 जणांकडून 22 हजार रुपये, दुचाकीवर डबलसीट 105 जणांकडून 21 हजार रुपये, दुचाकीवर ट्रिपलसीट 27 जणांकडून 20 हजार 500 रुपये, पाचपेक्षा अधिक लोक दुकानात असणाऱ्या तीन व्यापाऱ्यांकडून तीन हजार रुपये, विहित वेळेपेक्षा अधिक वेळ दुकान चालू ठेवले म्हणून चार व्यापाऱ्यांकडून चार रुपये, चारचाकी वाहनात तीन पेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करण्या चौघांकडून चार हजार रुपये, असा 75 हजार दंड वसूल केला आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात फिरणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT