Arrest 
सोलापूर

तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न ! नराधम पोलिसांच्या ताब्यात 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : चॉकलेटचे आमिष दाखवून तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नराधमा विरोधात पोक्‍सो कायद्या अंतर्गत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्‍यातील एका गावात मंगळवारी (ता. 2) दुपारी घडली. या प्रकरणी सुखदेव भोंगे (वय 49) या संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पंढरपूर तालुक्‍याच्या ग्रामीण भागात मोठी खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलींबाबत वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे तालुक्‍यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की संशयित आरोपी सुखदेव भोंगे (वय 49) हा मंगळवारी दुपारी आपल्या घरी एकटाच होता. त्याने बाजूच्या अल्पवयीन तीन मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून घरी बोलावले. घरात आणि आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधून त्याने तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, त्यातील एका मुलीने वासनांध झालेल्या नराधमाच्या तावडीतून आपली सुटका करून घेत ही घटना आपल्या घरी जाऊन सांगितली. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी नराधमाच्या घराकडे धाव घेऊन इतर मुलींची मोठ्या शिताफीने नराधमाच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर संशयित आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

या प्रकरणी संशयित आरोपी सुखदेव बोंगेच्या विरोधात पोक्‍सो कायद्या अंतर्गत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर तालुक्‍यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

तालुक्‍याच्या ग्रामीण भागात सध्या अनेक अवैध धंदे खुलेआमपणे सुरू आहेत. अशा अवैध धंद्यांमुळे अनेक गावांतील महिला आणि मुलींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अलीकडेच तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका महिलेने अशाच एका नराधमाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT