gold robbery sakal media
सोलापूर

पोलिस निरीक्षकांनी लढविली शक्कल..! चोरट्याने आणून टाकले अडीच लाखांचे दागिने

विणकर गणपतीजवळील उषा कंटीकर यांच्या घरातून त्यांच्या मुलीचे अडीच लाखांचे दागिने चोरट्याने चोरून नेले होते. पण, फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी चोरीचा घटनाक्रम समजून घेतला आणि त्यांनी शक्कल लढविली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चोरट्याने ते दागिने कंटीकर यांच्या घरासमोर आणून टाकले होते.

तात्या लांडगे

सोलापूर : येथील विणकर गणपतीजवळील उषा कंटीकर यांच्या घरातून त्यांच्या मुलीचे अडीच लाखांचे दागिने चोरट्याने चोरून नेले होते. पण, फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी चोरीचा घटनाक्रम समजून घेतला आणि त्यांनी शक्कल लढविली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चोरट्याने ते दागिने कंटीकर यांच्या घरासमोर आणून टाकले होते.

घटनेची हकीकत अशी, उषा कंटीकर यांची मुलगी हैदराबादहून माहेरी आली होती. येताना तिने स्वत:साठी घेतलेले अडीच लाखांचे नवीन दागिनेही आईला व मैत्रिणींना दाखवायला सोबत आणले होते. पण, २२ एप्रिलला माहेरी आलेल्या विद्या उमेश शास्त्री यांच्या मैत्रिणी घरी आल्या होत्या. त्यांनाही विद्या शास्त्री यांनी दागिने दाखवले आणि पुन्हा घरात नेऊन ठेवले. त्याच दिवशी रात्री त्यांच्या चुलत्याचे भांडण सुरु असल्याने विद्या व त्यांचे पती व आई हे सर्वजण चुलत्याच्या घरी खाली आले. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता सर्वजण त्यांच्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी विद्या या सासरी जाणार होत्या. सोमवारी (ता. २५) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ते हैदराबाद येथे जाणार होते. त्यावेळी दागिने पाहिले तर दागिने त्याठिकाणी नसल्याचे त्यांना समजले. घरात शोधाशोध केली, पण त्यांना दागिने सापडलेच नाहीत. त्यांची चिंता वाढली, आईलाही वाईट वाटू लागले, मग त्यांनी फौजदार चावडी पोलिस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पाटील यांची भेट घेऊन घटनाक्रम सांगितला. त्यानंतर ते इतर सहकाऱ्यांसोबत त्यांच्या घरी गेले.

बॉक्सवर ज्याचे फिंगर प्रिंट तोच चोर...
उषा कंटीकर यांच्या घरातून त्यांच्या मुलीचे (विद्या शास्त्री) यांचे दोन लाख ४० हजारांच्या किंमतीचे दागिने चोरीला गेले होते. पोलिस घटनास्थळी गेले आणि तेथील सर्वांना एकत्र बोलावून घेतले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी स्पष्ट केले, या दागिन्यांच्या बॉक्सवर ज्याचे फिंगर प्रिंट येतील तोच चोर असेल. त्याना जेलमध्ये जावे लागेल म्हणून ते बॉक्स घेऊन आले. दुसऱ्या दिवशी उषा कंटीकर यांचा कॉल आला आणि दागिने कोणीतरी घरात टाकून गेल्याचे सांगितले. त्यांची आयडिया त्याठिकाणी कामाला आली. वास्तविक पाहता त्या बॉक्सवरील फिंगर प्रिंटच शोधताच येत नव्हते. उषा कंटीकर व विद्या शास्त्री यांनी पोलिसांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 3rd T20I: वैभव सूर्यवंशीचं शतक थोडक्यात हुकलं, पण विश्वविक्रम रचला! क्रिकेट इतिहासात असा पराक्रम करणारा पहिलाच ठरला

आगामी विधानसभा निवडणूक लढणार नाही! माजी मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा, सक्रीय राजकारणातून निवृत्ती जाहीर...

Khelna Project Palod : खेळणा मध्यम प्रकल्पाच्या पाळूला काटेरी झुडपांचा विळखा; सिंचन व्यवस्थेला धोका, शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Abhijeet Dipke: आंदोलनात अभिजीत दिपकेंसोबत दिसलेली 'ती' तरुणी नेमकी कोण? अफवांमागचं सत्य जाणून घ्या...

COMMONWEALTH GAMES 2026 : भारताच्या खात्यात आणखी एक पदक! ऋषिकांत सिंगने राष्ट्रकुल विक्रम मोडला, रौप्यपदक जिंकले

SCROLL FOR NEXT