Mumbai Sakal
सोलापूर

वेश्याव्यवसाय करणाऱ्या 3 तरुणींची पोलिसांकडून सुटका! आधी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली अन्‌ पुन्हा बार्शी-जामगाव रोडवरील टुरिस्ट लॉजवर छापा

बार्शी ते जामगाव रोडवरील हॉटेल टुरिस्ट लॉजिंगमध्ये चालणाऱ्या कुंटणखान्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा टाकला. त्यावेळी तेथील परजिल्ह्यातील दोन व महाराष्ट्रातील दुसऱ्या जिल्ह्यातील एका तरुणीला वेश्याव्यवसाय करण्यासाठी ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्या पीडितांची सुटका केली असून दोघांना अटक केली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : बार्शी ते जामगाव रोडवरील हॉटेल टुरिस्ट लॉजिंगमध्ये चालणाऱ्या कुंटणखान्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा टाकला. त्यावेळी तेथील परजिल्ह्यातील दोन व महाराष्ट्रातील दुसऱ्या जिल्ह्यातील एका तरुणीला वेश्याव्यवसाय करण्यासाठी ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्या पीडितांची सुटका केली असून दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने अटक केलेल्या लॉज मालक व व्यवस्थापकास पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

बार्शीतून जामगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर टुरिस्ट हॉटेल आहे. तेथील लॉजिंगवर बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांच्या नेतृत्वातील पथकाने त्या हॉटेलवर छापा टाकला. तत्पूर्वी, बनावट ग्राहक पाठवून त्याठिकाणी वेश्याव्यवसाय सुरु असल्याची खात्री केली. त्या बनावट ग्राहकाकडून खात्री केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.

लॉज मालक राजेंद्र भीमराव मराठे (रा. जामगाव, ता. बार्शी) व हॉटेलचा व्यवस्थापक संतोष मच्छिंद्र नलवडे (रा. तुळजापूर रोड, बार्शी) या दोघांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपअधीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे, पोलिस उपनिरीक्षक श्री. काळे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.

बनावट ग्राहक पाठवून केली खात्री

पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सोलापूर ग्रामीणच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने गुरुवारी (ता. १२) रात्री उशिरा बार्शी-जामगाव रोडवरील हॉटेल टुरिस्ट लॉजवर छापा टाकला. छापा टाकण्यापूर्वी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पाठविला. त्यानंतर त्याला तिन्ही तरुणी दाखविण्यात आल्या, दरही सांगण्यात आला. तेथे वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे खबऱ्याने सांकेतिक खुणाद्वारे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्या लॉजवर छापा टाकला व वेश्याव्यवसायासाठी डांबून ठेवलेल्या तीन तरुणींची सुटका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटलसमोर सापडला जिवंत बॉम्ब; क्षणार्धात परिसर सील, सात तासांचा टाइमर सेट

Donald Trump: चीनमध्ये उतरताच डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान! स्वागतासाठी शी जिनपिंग गैरहजर; ड्रॅगनकडून अमेरिका-चीन संबंधांबाबत नवा संकेत?

Prateek Yadav: प्रतीक यादवच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम काय? डॉक्टरला बोलावण्याचीही संधी मिळाली नाही...

RCB VS KKR LIVE: अजिंक्य रहाणेने वर्ध्याच्या पोट्ट्याला दिली पदार्पणाची कॅप... जाणून घ्या कोण आहे सौरभ दुबे? ६ फूट ५ इंच उंचीचा गोलंदाज

"नजरेत धग अन् रग..."ओळखलंत का 'रंगी'ला? १९ जूनला होतंय 'घबाडकुंड'चं दर्शन!

SCROLL FOR NEXT