Police seize gangs looting the seraph 
सोलापूर

बुरखा घालून सराफांना लुटणारी "राणी'ची टोळी जेरबंद

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : बुरखा घालून सराफ दुकानात प्रवेश करायचा.., खरेदीचा बहाणा करून चौकशी करायची.., त्याच दरम्यान इतरही दोघे-तिघे खरेदीसाठी म्हणून दुकानात जायचे.. आणि मग सराफाची नजर चुकवून सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारायचा.. अशी स्टाइल असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या टोळीची प्रमुख राणी ऊर्फ राजेश्‍वरी अजय गायकवाड ही आहे. 


शशिकांत राजेंद्र जाधव (वय 30), गौराबाई बब्रुवान जाधव (वय 50), संगीता शेखर जाधव (वय 40), शकुंतला ऊर्फ शेकम्मा राजू गायकवाड (वय 45), राणी ऊर्फ राजेश्‍वरी अजय गायकवाड (वय 25, सर्व रा. रामवाडी, धोंडिबा वस्ती, सोलापूर), अरविंद यादगिरी जाधव (वय 40), ज्योत्स्ना अरविंद जाधव (वय 26, दोघे रा. सीतारामबाग इंदिरानगर, हैदराबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 30 जानेवारी रोजी दुपारी बुरखाधारी महिलांनी मंद्रूप येथील सराफ अशोक महादेव पत्तार (वय 41, रा. मंद्रूप) यांच्या दुकानात प्रवेश केला. सराफ दुकानदारांची नजर चुकवून डब्यात ठेवलेले तीन लाख 85 हजारांचे 11 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी मंद्रूप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. 


मिळालेल्या माहितीनुसार चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे जीपमधून कर्नाटकातून विजयपूरमार्गे सोलापूरकडे येत असल्याचे कळाले. त्यानुसार तेरामैल येथे पोलिसांनी सापळा लावला. पोलिसांनी थांबवण्याचा इशारा करूनही जीप थांबली नाही. पोलिसांनी जीपचा पाठलाग केला. जीपमधील महिला व पुरुषांना सराफ दुकानाच्या चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली. सर्वांनी सुरवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली. अधिक विश्‍वासात घेऊन चौकशी केली, तेव्हा गुन्ह्याची कबुली दिली. यात सातही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 14 लाख 53 हजारांचे सोन्याचे दागिने, कर्नाटकातील चोरीचे दागिने, जीप असा एकूण 16 लाख 88 हजार 803 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 


या गुन्ह्यासह सोलापूर शहरातील विजापूर नाका, मिरज, कर्नाटक राज्यात बल्लारी, दावणगिरी अशा पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुरखे घालून सराफ दुकानदारांना लुटल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. पुढील तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण सावंत यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित आवटे, अशोक ढवळे, ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, मोहन मनसावाले, दिलीप राऊत, रवी माने, अनिसा शेख, राहुल सुरवसे यांच्या पथकाने केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तानचं हे अती झालं! म्हणतात 'हस्तांदोलन' प्रकरणावर कारवाई करा अन्यथा UAE च्या लढतीवर बहिष्कार टाकतो...

Latest Marathi News Updates :मुसळधार पावसामुळे सोलापूरकरांचे हाल, नागरिकांच्या घरात शिरलं ड्रेनेजचं पाणी

खूपच इमोशनल... प्रेक्षकांना कसा वाटला 'लपंडाव' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात- रुपालीऐवजी दुसरी कुणी...

Crime: अनैसर्गिक कृत्य! २ तरुणांच्या गुप्तांगावर २३ वेळा स्टेपल अन् मिरचीचा स्प्रे...; जोडप्याचा कारनामा, भयंकर कारण समोर

Crime News : नाशिकमधील बेकायदा कॉल सेंटरवर सीबीआयची धाड; यूकेतील नागरिकांना गंडा

SCROLL FOR NEXT