वैराग (सोलापूर) : हमरस्त्यात ट्रकमधील डिझेल काढून बोलेरो जीपमध्ये भरणे त्यांना चांगलेच महागात पडले. तीन ट्रक व एक जीप अशी चार वाहने जप्त करून सुमारे 45 ते 55 लाखांचा मुद्देमाल वैराग पोलिसांनी जप्त केला आहे. एखाद्याने सहज दिलेली माहिती किती महत्त्वाची व परिणामकारक ठरते, या गोष्टीचा प्रत्यय वैराग येथे सागर हॉटेलसमोर आला.
बार्शी - सोलापूर रोडवर चार वाहने संशयास्पदरीत्या आढळली. तीन ट्रक व एक जीप या वाहनांचे पासिंग, नंबर प्लेट संशयास्पद वाटल्याने एका सामाजिक कार्यकर्त्याने ही माहिती पोलिसांना दिली. यावर वैराग पोलिसांचा ताफा घटनास्थळी आला. या वेळी पोलिसांना एमएच 19 - जे 3614, एमएच 17 - 7069 या दोनसह आणखी एक ट्रक व नंबर प्लेट नसलेली जीप अशी चार वाहने उभी असलेली आढळून आली. त्यामध्ये काही लोक डिझेल भरत होते. आपले भांडे आता फुटणार, आपण पकडले जाणार या भीतीने ते पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी वाहनांचे पासिंग, नंबर प्लेट व त्यावरील नंबर, चेसी नंबर आदींची चौकशी करून आरसी बुक, लायसन व इतर कागदपत्रे दाखवा म्हणताच उभे राहिलेले वाहनचालक व मालक पसार झाले.
चारही वाहने वैराग पोलिसांनी केली आहेत. या घटनेची माहिती बार्शी - सोलापूरच्या वरिष्ठ कार्यालय व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांना दिली आहे. घटनेचा पंचनामा करून ठाणे अंमलदाराने स्टेशन डायरीत नोंद केली आहे. ही वाहने गेवराई भागातील असून ऊस तोडीसाठी टोळी प्रमुखांनी ही वाहने वैराग भागात आणली आहेत. ही वाहने चोरीच्या प्रकारातून तयार करून लांब ठिकाणी वापरण्याचा इरादा असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.