Mom & Daughter 
सोलापूर

दोन वर्षांच्या मुलीचे वडील दारू ढोसून बेशुद्ध; पोलिसांची सतर्कता व सोशल मीडियामुळे झाली मुलीची आईशी भेट !

चेतन जाधव

अक्कलकोट (सोलापूर) : सोशल मीडिया व पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या सहा तासांत दोन वर्षांच्या मुलीला तिच्या आईची भेट घडवून आईकडे सुपूर्द करण्यात आले. पोलिसांच्या या मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

याबाबतची माहिती अशी, की शहरात दिनांक बुधवारी (ता. 28) सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान अक्कलकोट बसस्थानकावर एक 28 वर्षांचा बेशुद्ध इसम व दोन वर्षांची लहान मुलगी मिळून आली. या मुलीचे वडील दारूच्या नशेमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडून होते. त्या व्यक्तीजवळ लहान मुलगी रडत बसली होती. त्या वेळी कर्तव्यावर असलेले पोलिस अंमलदार अनिल चव्हाण यांनी त्या लहान मुलीस पोलिस स्टेशन येथे आणून महिला कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. 

त्यांनतर पोलिस निरीक्षक कल्लप्पा पुजारी व सोबत गोपनीय अंमलदार धनराज शिंदे आणि पोलिस अंमलदार मियावाले, पोलिस अंमलदार भंडारी यांना घेऊन एसटी स्टॅंड परिसरात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या इसमाचा फोटो काढून वेगवेगळ्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर व्हायरल केले. त्यामुळे सोशल मीडियाच्याद्वारे लोकांपर्यंत लहान मुलीचा आणि बेशुद्ध इसमाचा फोटो पोचला आणि अवघ्या पाच ते सहा तासांत त्या व्यक्तीची ओळख पटली. 

ती व्यक्ती जावेद जमादार आणि त्याची मुलगी जिया (वय 2 वर्षे, रा. आलूर, ता उमरगा, जि उस्मानाबाद) येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्या व्यक्तीच्या पत्नीस व पोलिस ठाण्यास बोलावून त्या छोट्याशा मुलीला ताब्यात दिले. तेव्हा मुलीच्या आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळत होते. 

ही कामगिरी पोलिस निरीक्षक पुजारी यांच्यासह ठाणे अंमलदार मनोज भंडारी, पोलिस हवालदार यमाजी चव्हाण, गोपनीय अंमलदार धनराज शिंदे, पोलिस अंमलदार फिरोज मिण्यावाले, अनिल चव्हाण, महिला अंमलदार शारदा हिप्परगी, अंजू कोळी, अश्विनी हाके यांनी केली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Baby Girl Born : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कन्यारत्नाचे आगमन... आणि तेही रुग्णवाहिकेत! ; ‘१०८’ टीम ठरली देवदूत

Latest Marathi News Live Update : जळगावच्या होलसेल बाजारात इंडक्शन व इलेक्ट्रिक शेगड्यांचा तुटवडा

Broiler Chicken : बॉयलर जिवंत कोंबड्यांना उच्चांकी दर; चिकनच्या दरात मोठी वाढ

SCROLL FOR NEXT