Pomegranate 
सोलापूर

मंगळवेढा बाजार समितीमध्ये डाळिंबाला मिळाला 511 रुपये विक्रमी दर ! 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या डाळिंब खरेदी - विक्री लिलावात जत येथील शेतकऱ्याच्या डाळिंबाला प्रति किलो 511 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे. निर्यातक्षम डाळिंबापेक्षा दुसऱ्यांदा एवढा जास्त दर या डाळिंबाला मिळाला. 

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक बबनराव आवताडे व श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांच्या संकल्पनेतून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब खरेदी - विक्री सौदे सुरू करण्यात आले आहेत. आठवड्यातील प्रत्येक सोमवार, बुधवार व शुक्रवारच्या सौदे लिलावत सोलापूर, पंढरपूर, 
सांगोला, जत, मोहोळ व कर्नाटक या भागातून डाळिंबाची आवक वाढू लागली आहे. मंगळवेढा येथील खरेदीदार डाळिंब खरेदी करून दिल्ली, गुजरात, मुंबई, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार व आसामला पाठवत असल्याने डाळिंबास चांगला दर मिळू लागला आहे. 

मोहन माळी या आडत दुकानात झालेल्या डाळिंब सौद्यात रावसाहेब लवटे (रा. जत) या शेतकऱ्याच्या डाळिंबाला 511 रुपयांचा दर देत राम बाबर (सांगोला) यांनी खरेदी केला. तर कुमार चिकोडी (रा. जत) व दत्ता धाइंगडे (रा. वाकी, ता. सांगोला) या शेतकऱ्यांना खरेदीदार आकाश गुजर यांच्याकडून 502 रुपये असा दर मिळाला. तर आनंद लवटे व सुरेश माळी (रा. जत) यांनाही चांगला दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

या वेळी बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, उपसभापती प्रकाश जुंदळे, सचिव सचिन देशमुख, मोहन माळी, रामचंद्र बाबर, आकाश गुजर, विनायक शेंबडे, भानुदास सलगर, दत्तात्रय शिंदे व विनायक आवताडे आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

Mangalevedha Basaveshwar Memorial News: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी सह्यांची लाट; एका दिवसात 1040 नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pune Ambegaon gas distribution: ‘सकाळ’च्या बातमीचा परिणाम: आंबेगाव तहसीलदारांच्या हस्तक्षेपानंतर अवसरी खुर्दमध्ये सव्वा महिन्यानंतर गॅस टाक्यांचे वितरण सुरू

Shirur Crime News: शिरूरमध्ये एटीएसची कारवाई; सतरा कमानी पुलाजवळ दोन जणांना अटक, गावठी पिस्तुल जप्त

SCROLL FOR NEXT