Pomegranate growers in financial crisis again in sangola taluka 
सोलापूर

पाऊस काही थांबेना, कळी काही निघेना; डाळिंब उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात 

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : यंदा सतत पडणाऱ्या पावसाने जमिनीतील ओलावाच कमी होत नसल्याने डाळिंबाच्या झाडांना कळीच लागली नाही. तर अगोदर बहार धरलेल्या डाळिंबावर मोठ्या प्रमाणात कुजवा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. एकीकडे कोरोना महामारीचे संकट तर दुसरीकडे डाळिंब उत्पादक निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकले आहे. 'पाऊस काही थांबेना, कळी काही निघेना' अशीच अवस्था सध्या सांगोला तालुक्‍यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. 
'पंढरपूर पाण्याचं, मंगळवेढा दाण्याचं व सांगोला सोन्याचं' अशी एक म्हण प्रचलित आहे. परंतु कालांतराने सांगोला तालुक्‍यातील डाळिंबाच्या विक्रमी उत्पादनामुळे 'सांगोला डाळिंबाचं' अशी ओळख निर्माण झाली आहे. परंतु तालुक्‍याची ओळख बदलणारा डाळिंब उत्पादक शेतकरी आज अडचणीत सापडला आहे. यावर्षी गेल्या वीस वर्षातील पहिल्यांदाच एवढा पाऊस झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे सध्या डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. अगोदर बहार धरलेल्या डाळिंबावर मोठ्या प्रमाणात कुजवा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर जुलै-ऑगस्टमध्ये बहार धरलेल्या डाळिंबांना अद्यापही कळी (फुले) निघत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. एकीकडे कोरोनाच्या महामार्गामुळे सर्वच क्षेत्रे ठप्प झाली असताना शेतकरी राजा मात्र त्याच्याशी दोन हात करीत होता. परंतु सध्या अतिवृष्टीमुळे सांगोला तालुक्‍यात डाळिंब उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. खते, औषधांचा यांचा मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. परंतु डाळिंबावर मात्र रोगराईचा प्रादुर्भाव वाढत असताना बहार धरलेल्या डाळिंबांना कळी निघत नसल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी चांगलाच वैतागलेला दिसून येत आहे. 

नुकसान भरपाईची होतेय मागणी 
डाळिंबाचे उत्पादन मोठे दिसत असले तरी सध्या डाळिंबावर होणारा खर्चही खर्चाच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. डाळिंबावरील तेल्या, मर व इतर रोगराई सतत वाढतच आहे. यावर्षी सतत पडणाऱ्या पावसामुळे डाळिंबाची अवस्था वाईट झाली आहे. खर्च होत असला तरी उत्पादन येईलच याची शाश्वती नाही. सध्या अतिवृष्टीमुळे काही भागातच पंचनामे झाले. परंतू पावसाने फुलगळती व इतर रोगांमुळे डाळिंबाची मोठी हानी झाली आहे. याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. चालूवर्षी डाळिंब बागांना सरसकट शासनाने नुकसान भरपाई किंवा अनुदान द्यावे अशी मागणी डाळिंब उत्पादक शेतकरी करीत आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील विद्यापीठांवर राज्यपालांची कडक नजर! त्रैमासिक अहवाल सादर करणे अनिवार्य; प्रशासनाला नवा धक्का

R Ashwin ने कसोटीतून निवृत्तीसाठी गौतम गंभीरला ठरवले जबाबदार? पर्थ कसोटीत काय घडले ते सांगितले... मन मोकळे केले...

Latest Marathi News Live Update :एलपीजीची परिस्थिती अजूनही चिंताजनक: सरकार

"साडी चुरगळू नये म्हणून ती.." प्रसिद्ध डिझायनरचा ऐश्वर्याविषयी धक्कादायक खुलासा; म्हणाला..

Gudipadwa: गुढीपाडव्याला घरपोच पुरणपोळी! महापालिकेचा उपक्रम; ऑर्डर करण्याची प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT