Pomegranate orchards Sangola destroyed due shot hole borer
Pomegranate orchards Sangola destroyed due shot hole borer  sakal
सोलापूर

सांगोल्याच्या अर्थकारणावर 'पिन होल बोरर'मुळे होणार दीर्घकालीन परिणाम

दत्तात्रय खंडागळे

सध्या सांगोला तालुक्यातील डाळिंबाच्या बागा 'पिन होल बोरर'मुळे मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. त्यामुळे यापुढील काळात तालुक्याच्या अर्थकारणावर याचा दीर्घकालीन मोठा परिणाम होणार आहे. दुष्काळी तालुका म्हणून सांगोल्याची ओळख डाळिंब पिकामुळे बदललेली होती. गेल्या काही वर्षापासून डाळिंबमुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे जीवनमानच एकदम बदलून गेले होते. दुसऱ्याच्या शेतात कामाला जाणारा मजूरही डाळिंबाच्या उत्पन्नामुळे चारचाकी गाडीतून फिरु लागला होता. तालुक्यात डाळिंबाच्या उत्पन्नामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलनही मिळू लागले होते. तालुक्यात राज्यासह परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांसह कामगारही स्थायिक झाले होते. डाळिंबाला पॅकिंग करण्यासाठी लागणारे बॉक्स, कतरण, गमटेप (चिकटपट्टी) व इतर साहित्याचा उद्योगही जोमात सुरू होता. डाळिंबमुळे इतर उद्योगीही वाढीस लागले होते.

खोड भुंगेरामुळे लागले ग्रहण -

दुष्काळी सारख्या स्थितीवर मात करीत कमी पाण्यावर कष्टाने जोपासलेल्या डाळिंब बागा सध्या 'पिन होल बोरर' (खोड भुंगेरा) यामुळे मोठ्या प्रमाणात जळून जाऊ लागल्या आहेत. शेतकरी नानाविध उपाय करूनही यावर इलाज होत नसल्याने जिवापाड जपलेल्या डाळिंबाची झाडे जळून जात आहे. याअगोदर याचे प्रमाण कमी होते, परंतु वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात बागाच्या बागा या रोगामुळे नष्ट होऊ लागल्या आहेत. त्यामुळे शेतकरी जळालेल्या बागा काढून टाकत असल्याचे चित्र तालुक्यात सगळीकडेच दिसत आहे.

पाव्हणं आता यापुढं कसं..

डाळिंबाच्या उत्पादनामुळे उत्पादकांसह अनेकांनी विविध व्यवसायात आर्थिक गुंतवणूक केली होती. काही उद्योग डाळिंबवर आधारित होते तर काहीनी इतर उद्यागात गुंतवणूक केली होती. परंतु मुख्य डाळिंब नसतं होत असल्याने त्यावर आधारित उद्योग व उत्पादकांचे एकूण गणितच बिघडले आहे. घरामध्ये येणार पाहुणेही डाळिंबीवर चर्चा करीत असताना 'पाहूणं आता यापुढं कसं..' असे सहज बोलून प्रश्न विचारत आहेत.

सध्या तालुक्यात डाळींबाचे उत्पन्न कमी झाल्यामुळे याचा परिणाम आमच्या व्यवसायावरही जाणवत आहे. परंतु यापुढील काळामध्ये तो प्रकर्षाने जाणवणारा असल्याने आमच्या व्यवसायावर याचा मोठा परिणाम होणार आहे - प्रशांत दौंडे, कापड व्यापारी, सांगोला.

सध्या सांगोला तालुक्यातील डाळिंब बागा जळून जाऊ लागल्याने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. शेतकऱ्यांकडे येणारा आर्थिक सोर्सच बंद झाल्याने शेतकरी यापुढील काळात मोठ्या प्रमाणात संकटात सापडणार आहे. शासनाने या डाळिंब उत्पादकांना लवकर आर्थिक पॅकेज जाहीर करावे.

- डॉ. बाबासाहेब देशमुख, प्रदेशाध्यक्ष, पुरोगामी युवक संघटना

माझ्याकडे डाळिंबाची जवळ-जवळ साडेचार हजार झाडे होते. परंतु सध्या मोठ्या प्रमाणात झाडे जळून गेल्याने पाचशेसुद्धा झाडे शिल्लक राहिली नाही. तेही झाडे लवकरच काढावी लगतील त्यामुळे यापुढील काळात डाळींबाचे उत्पन्न येणार नसल्याने घरचे संपूर्ण अर्थकारणच बदलणार आहे.

- आप्पासो खंडागळे, डाळिंब उत्पादक, संगेवाडी, ता. सांगोला

आमचा सर्वात मोठा शेतकरी हाच ग्राहक आहे. शेतकऱ्यांकडे सुबत्ता, चलन असेल तर संपूर्ण बाजारपेठ व्यवस्थित चालते. परंतु सध्या डाळींबामुळे शेतकरीच अडचणी आल्याने आमच्या व्यवसायावरील परिणाम झाला आहे. परंतु यापुढील दीपावलीनंतर याचा मोठा परिणाम आमच्या व्यवसाय जाणवणार आहे.

- चंदन होनराव, किराणा व्यापारी, सांगोला

मी गेली 25 ते 30 वर्षे फक्त डाळिंबा व्यापार करत आहे. याअगोदर सांगोला तालुक्यातून दोन ते अडीच हजार पॅकिंग बॉक्स, तसेच गेल्या काही वर्षांमध्ये 600 ते 700 कॅरेट डाळिंब माझ्याकडे विक्रीसाठी येत होते. परंतु सध्या एक कॅरेटही डाळिंब तालुक्यामधून विक्रीसाठी येत नाही. त्यामुळे आमचा आडत व्यवसायही अडचणीत आला आहे.

- संतोष खेडेकर, डाळिंबाचे अडते व व्यापारी, नवी मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT