pomegranate1 
सोलापूर

पंढरपूर बाजार समितीमध्ये डाळिंबाची निचांकी आवक ! अचानक आवक घटल्याने दरात झाली वाढ 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : पश्‍चिम महाराष्ट्रात डाळिंब खरेदी- विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी डाळिंबाची निचांकी आवक झाली आहे. केवळ शंभर ते दीडशे क्रेट इतकीच आवक झाल्याने येथील कोट्यवधी रुपयांची होणारी आर्थिक उलाढालही ठप्प झाली आहे. दरम्यान, आवक घटल्याने डाळिंबाच्या दरात वाढ झाली आहे. 

सोलापूर, पुणे, सांगली, नगरसह कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणावर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारात डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणावर होते. इतर बाजार समित्यांपेक्षा येथील सौदे बाजारात शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असल्याने येथे दररोज साधारण 12 ते 14 हजार क्रेट डाळिंबाची आवक होते. यातून येथील दैनंदिन डाळिंब बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. परंतु, मागील तीन ते चार महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी, महापूर आणि सततच्या हवामान बदलामुळे डाळिंब बागा धोक्‍यात आल्या आहेत. परिणामी डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे. त्यामुळे डाळिंब बाजारावर त्याचा परिणाम दिसू लागल आहे. 

मागील आठ दिवसांपासून येथील बाजारात डाळिंबाची आवक निचांकी पातळीवर आली आहे. शनिवारी (ता. 30) झालेल्या डाळिंब सौदे बाजारात केवळ दीडशे क्रेट डाळिंबाची आवक झाली. आवक कमी झाल्याने डाळिंबाचे दर मात्र प्रतिकिलो शंभर ते सव्वाशे रुपयांपर्यंत गेले आहेत. शनिवारी डळिंब सौदे बाजार असूनही आवक नसन्याने बाजारात सर्वत्र शांतता आणि शुकशुकाट होता. डाळिंब बाजार सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच आवक नसल्याने बाजार ओस पडला होता. डाळिंब आवक कमी झाल्याने व्यापारी, दलाल आणि डाळिंब पॅकिंग करणाऱ्या मजुरांचेही आर्थिक नुकसान होत आहे. एकूणच येथील बाजारातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. 

अतिवृष्टी आणि सततच्या बदलत्या हवामानामुळे डाळिंबाचे उत्पादन घटले आहे. त्याचा परिणाम बाजारावरही झाला आहे. आतापर्यंत येथील बाजारात दररोज 12 हजाराहून अधिक क्रेट डाळिंबाची आवक होत असते, मात्र सध्या बाजारातील आवक घटली आहे. पंढरपूरसह इतर स्थानिक बाजारातही अशीच अवस्था आहे. आज झालेल्या डाळिंब सौदे बाजारात केवळ दीडशे क्रेट आवक झाली. त्यामुळे आर्थिक उलाढाल कमी झाली आहे. 
- दिलीप घाडगे, 
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Ghee Adulteration : तिरुपती लाडूच्या तुपात पाम तेल आणि रसायनांचा वापर? EDकडून कंपनीच्या प्रवर्तकाला अटक

Farmer Loss Assessment : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; पाच ऑक्टोबरपासून पंचनामे करण्याचे आदेश

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

Ancient Ganesh Idol : गणेशोत्सवात अद्भुत योग! 1800 वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आलास गावात सापडली 1200 वर्षे जुनी चालुक्यकालीन प्राचीन गणेशमूर्ती अन् नंदी

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

SCROLL FOR NEXT