Ajit_Pawar 
सोलापूर

मंगळवेढा शहरालगतच्या दोन ग्रामपंचायती नगरपालिकेत होणार विलीन? 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : नगरपालिकेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर विकास सचिवांना दिली. यामुळे मंगळवेढा शहरालगतच्या दोन मोठ्या ग्रामपंचायतींसह इतर लोकवस्ती नगरपालिकेत येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष सोमनाथ माळी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्याबाबतचे निवेदन देत त्यांच्याशी चर्चा केली. 

दिवंगत आमदार भारत भालके यांनी चोखामेळा नगर व दामाजी नगर या दोन स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात आणल्या. परंतु या दोन ग्रामपंचायतींना पाणी व इतर काही सुविधांसाठी नगरपालिकेवर अवलंबून राहावे लागत आहे. नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या दोन ग्रामपंचायतींची स्वच्छता व इतर गोष्टी करणे पालिकेला शक्‍य होते. शिवाय या दोन ग्रामपंचायतींमधील बहुसंख्य मिळकतधारक आर्थिकदृष्ट्या संपन्न होते. परंतु, ते ग्रामपंचायतीकडे विलीन झाल्यामुळे त्यांच्यापासून मिळणारे नगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. 

सध्या या दोन ग्रामपंचायतींसह अकोला रस्त्यालगत असलेली जय भवानी कॉलनी, शरद कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी, एकवीरा माळ या भागात जवळपास 14 हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे. हा भाग नगरपालिकेत समाविष्ट झाल्यास नगरपालिकेला त्यांच्याकडून कर रूपाने उत्पन्न मिळणार असून, त्यांना नगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य, दिवाबत्ती व इतर सुविधा, विकासाच्या योजनांचा लाभ देणे देखील शक्‍य होणार आहे. त्या दृष्टीने नगरविकास सचिव यांना याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ सूचना दिल्या आहेत. 

याशिवाय शहरामध्ये भुयारी गटार योजना राबवण्यासाठी 42 कोटी 50 लाखांच्या प्रस्तावावर लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याची माहिती सोमनाथ माळी यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT