नऊशे वर्षांची परंपरा! सिद्धेश्‍वर यात्रा परवानगीबाबत आज निर्णय esakal
सोलापूर

नऊशे वर्षांची परंपरा! सिद्धेश्‍वर यात्रा परवानगीबाबत आज निर्णय

नऊशे वर्षांची परंपरा! श्री सिद्धेश्‍वर यात्रेच्या परवानगीबाबत आज निर्णय

तात्या लांडगे

श्री सिद्धेश्‍वरांच्या यात्रेस काही दिवसांचा अवधी उललेला असतानाही, अजून महापालिका आयुक्‍तांनी त्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेतलेला नाही.

सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्‍वरांच्या यात्रेस (Solapur Siddheshwar Yatra) काही दिवसांचा अवधी उललेला असतानाही, अजून महापालिका आयुक्‍तांनी त्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेतलेला नाही. आयुक्‍त सुट्टीवर असल्याने प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) व महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त विजय खोराटे (Vijay Khorate) यांनीही मंदिर समितीच्या निवेदनावर निर्णय घेतला नाही. आता आज (सोमवारी) महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर (P. Shivshankar) हे कामावर रुजू होतील. त्यावर अंतिम निर्णय होऊ शकतो, अशी माहिती खोराटे यांनी दिली. (Possibility of decision regarding Shri Siddheshwar Yatra today)

कोरोनातील (Covid-19) निर्बंधांमुळे मागील दोन वर्षांपासून ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वरांची यात्रा भरू शकली नाही. आता निर्बंध शिथिल केल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. विवाहावरील निर्बंधही उठविले असून सार्वजनिक ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम होत आहेत. अनेक ठिकाणी यात्रादेखील होऊ लागल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी सिद्धेश्‍वर देवस्थान पंच कमिटीने (Siddheshwar Devasthan Panch Committee) महापालिकेकडे केली आहे. 7 डिसेंबरला निवेदन देऊनही त्यावर अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही. दरम्यान, नॉर्थकोट मैदानावरील 'क्रेडाई'ला (CREDAI) परवानगी दिल्याने होम मैदानासह मंदिर परिसरात छोट्या व्यावसायिकांचे स्टॉल लावण्यास परवानगी मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. परंतु, त्यावर सोमवारी निर्णय होऊ शकतो.

ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महाराजांच्या यात्रेला परवानगी देण्यासंदर्भात अजून कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. महापालिका आयुक्‍त कामावर रुजू झाल्यानंतर त्यावर निर्णय होईल.

- विजय खोराटे, अतिरिक्‍त आयुक्‍त, सोलापूर महापालिका

900 वर्षांची परंपरा

ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्‍वर महाराजांच्या यात्रेला नऊशे ते साडेनऊशे वर्षांची परंपरा आहे. त्यात ब्रिटिश कालखंडातही खंड पडला नाही. परंतु, कोरोनामुळे मागील दोन वर्षांत यात्रा साधेपणाने साजरी करावी लागली. आता कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला असून प्रतिबंधित लसीचे दोन्ही (Covid Vaccine) डोस घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे यात्रेला परवानगी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 12 ते 16 जानेवारी या कालावधीत यात्रा होणार असून 13 जानेवारीला तैलाभिषेक सोहळा, 14 जानेवारीला अक्षता सोहळा, 15 जानेवारीला होम प्रदीपन आणि 16 जानेवारीला होम मैदानावर शोभेचे दारुकाम, असे यात्रेचे नियोजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT