1cyber_crime_ - Copy.jpg 
सोलापूर

सायबर पोलिस म्हणाले ! मद्यपेय घरपोच मिळेल अशा खोट्या मेसेजवर... 

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे इंटरनेटचा वापर वाढला असून अनेक कंपन्यांकडून फसवे मेसेज (लिंक) फेसबूक, व्हॉट्‌सअप आणि मोबाइल क्रमांकावर येत आहेत. मद्यपेय 30 ते 40 मिनिटात घरपोच मिळेल यासह अन्य मेसेज पाठविले जात असून नागरिकांनी त्याला बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. 

लॉकडाउनमध्ये सर्वजण घरात बसून आहेत. त्यांच्याकडून इंटरनेटचा वापर वाढल्याने अनेक कंपन्यांकडून खोटे मेसेज तथा लिंक पाठविल्या जात आहेत. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कुटुंबातील एका सदस्यास 25 हजार रुपये मिळतील. त्यासाठी दिलेल्या लिंकवरुन फॉर्म भरावा, असे सांगितले जात आहे. तर प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजनेअंतर्गत नोंदणी करा अन्‌ महिन्याला साडेतीन हजार रुपये मिळवा, मात्र त्यासाठी मोबाईलवरील लिंकवरुन अर्ज भरावा, असे बजावले जात आहे. तसेच आम्ही पाठविलेली लिंक 20 लोकांना तथा पाच व्हॉट्‌सअप ग्रूपला पाठवा अन्‌ दोन महिन्यांकरिता नेट फ्री मिळवा, असेही मेसेज येत आहेत. जीओ कंपनीकडून दररोज 25 जीबीचा डेटा सहा महिन्यांकरिता मिळेल, मात्र लिंक डाउनलोड करुन नोंदणी करा, असे सांगितले जाते. नागरिकांच्या मोबाईलवर कॉल करुन तुमच्या ईएमआयची तारीख जवळ आली असून त्यात वाढ केली जाईल. मात्र, त्यासाठी तुमच्या मोबाईलरील ओटीपी शेअर करा, असेही कॉल येत आहेत. 

मद्यपेय घेणाऱ्यांसाठी अनोखा सायबर गुन्हेगारांचा फंडा 
लॉकडाउन अन्‌ संचारबंदीमुळे मद्यपेय घेणाऱ्यांची मोठी पंचाईत झाली आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रकार घडत असल्याचे ओळखून आता सायबर गुन्हेगारांनी मद्यपेय घेणाऱ्यांसाठी फसवणुकीचा अनोखा फंडा तयार केला आहे. 30 ते 40 मिनिटांमध्ये घरपोच मद्यपेय मिळेल, त्यासाठी दिलेल्या लिंकवर नोंदणी करा, असे फेसबुकवरुन खोटे मेसेज व्हायरल केले जात आहेत. अशा कोणत्याही अमिषाला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: मोदी सरकारमधील कोणत्या मंत्र्याने सर्वात वाईट कामगिरी केली? ५ मंत्र्यांची यादी तयार; खुद्द पंतप्रधानांनीच घेतली बैठक

शुभमन गिलचा IPL 2026 मधील बेस्ट कॅच... शिवम दुबेला माघारी पाठवून फिरवली मॅच Video Viral

Latest Marathi News Live Update : फोंडा घाटातून वाहतुकीवरील निर्बंध दहा जूनपर्यंत कायम

आधी घर आणि आता अलिशान गाडी! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याने खरेदी केली नवी कोरी कार, किंमत ऐकून थक्क व्हाल

Solapur OBC Hostel News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! वसतिगृह प्रवेश नियमित, ५१०० रुपये निर्वाह भत्ता मंजूर, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

SCROLL FOR NEXT