prabhakar deshmukh demand to cm eknath shinde Forgive farmers overdue electricity bill increase milk price  sakal
सोलापूर

Solapur News : शेतकऱ्यांचे थकीत विज बील माफ करा,दुधाला दर वाढवुन द्या - प्रभाकर देशमुख

राज्यातील शेतकरी कोविड, लॉकडाऊन व सततच्या नैसर्गिक आपत्ती मुळे आर्थिक संकटात आहे.

राजकुमार शहा

मोहोळ : राज्यातील शेतकरी कोविड, लॉकडाऊन व सततच्या नैसर्गिक आपत्ती मुळे आर्थिक संकटात आहे. त्यामुळे शेतकऱ्या कडे असलेले शेती पंपाचे थकीत विज बील शंभर टक्के माफ करावे अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे हे पंढरपूरच्या आषाढी वारी निमित्ताने पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महापूजेला आले असता त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन देशमुख यांनी विविध मागण्यांचे लेखी निवेदन दिले. यावेळी जनहितचे जिल्हा संघटक सुरेश नवले, युवक जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे, ज्ञानेश्वर भोसले, निसार पाटील, उत्तम सरडे, नाना बिचुकले, दादा भगरे, संजय पाटील, उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या लेखी निवेदनात देशमुख यांनी म्हणले आहे की ,महाराष्ट्र राज्यातील शेतकरी लॉकडाऊन, अवकाळी पाऊस, गारपीट इतर अनेक नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आहे.

कोविड लॉकडाऊन काळामध्ये उद्योगधंदे बंद असताना महावितरणने विज बिले वसुल केली आहेत, ती त्वरित माफ करून त्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत, प्रत्येक वर्षी चुरा पेंड, सुग्रास,भरड़ा या पशुखाद्याच्या दरात भरमसाठ वाढ केली जाते,

मात्र दूध उत्पादक शेतकऱ्याना दर दिला जात नाही,हा अन्याय का?. गाईच्या दुधाला प्रति लिटर 50 रुपये व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 80 रुपये दर शासनाने जाहीर करावा या महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT