Pradhan Mantri Kisan Sanman Yojana Sakal
सोलापूर

प्रधानमंत्री सन्मान योजना : अपात्र शेतकऱ्यांकडून 15 लाखांची वसुली

प्रधानमंत्री सन्मान योजनेतील अपात्र शेतकऱ्यांवर पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी कारवाईचा बडगा उगारताच अशा शेतकऱ्यांनी सुमारे 15 लाख रुपये शासनाला परत केले आहेत.

- भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) - प्रधानमंत्री सन्मान योजनेतील अपात्र शेतकऱ्यांवर पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी कारवाईचा बडगा उगारताच अशा शेतकऱ्यांनी सुमारे 15 लाख रुपये शासनाला परत केले आहेत. या कारवाई अंतर्गत तालुक्‍यातील सुमारे दोन हजार अपात्र शेतकऱ्यांची बॅंक खाती सील करण्यात आली आहेत. या कारवाईनंतर खडबडून जागे झाल्या या शेतकऱ्यांची पैसे भरण्यासाठी धावपळ सुरु केली आहे.

प्रधानमंत्री सन्मान योजनेसाठी तालुक्‍यात सुमारे 79 हजार 441 लाभार्थी शेतकरी आहेत. दरम्यान विविध कारणांमुळे या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून लाभाची रक्कम वसूल करण्यासाठी तालुक्‍यातील सुमारे दोन हजार शेतकऱ्यांची बॅंक खाती सील करण्यात आली आहेत. तहसीलदारांच्या कारवाईच्या बडग्यानंतर अपात्र शेतकऱ्यांनी घेतलेल्या लाभाची रक्कम परत करण्यास सुरवात केली आहे. मागील पंधरा दिवसामध्ये 196 बॅंकांकडून 14 लाख 98 हजार 298 रुपये शासनाकडे परत करण्यात आले आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी पात्र झालेल्या 940 शेतकऱ्यांचा मृत्यु झाला आहे तर 1 हजार 897 शेतकरी आयकर पात्र ठरले आहेत. अशा अपात्र शेतकऱ्यांकडून जवळपास 2 कोटी 38 लाख 36 हजार रुपये वसुल केले जाणार आहेत. सन्मान योजनेतून मिळालेले पैसे तत्काळ भरावेत यासाठी प्रशासनाकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र संबंणित शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर महसूल प्रशासनाने वसुलीसाठी अपात्र ठरलेल्या दोन हजार शेतकऱ्यांची बॅंक खाती सील केली.

प्रशासनाच्या कारवाईनंतर 47 अपात्र शेतकऱ्यांनी 3 लाख 56 हजार रुपये तर आयकर पात्र 910 शेतकऱ्यांनी 90 लाख 70 रुपये यापूर्वीच भरले आहेत. अन्य शेतकरी मात्र पैसे भरण्यास चालढकल करत आहेत. अशा शेतकऱ्यांची बॅंक खाती सील केली आहेत. त्यानंतरही जे शेतकरी लाभाची रक्कम परत करणार नाहीत, अशा शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढवण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही तहसीलदार श्री. बेल्हेकर यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Air Force Aircraft Crash : ब्रेकिंग न्यूज! आसाममध्ये भारतीय हवाई दलाच्या AN-32 विमानाचा अपघात

Pranit More : 'मी चांगला माणूस बनून दाखवेन, एक संधी द्या'; प्रणित मोरेची माफी, पण सायबर पोलिस करणार जुन्या व्हिडिओंचा तपास

Mumbai Local: लोकलसह एक्स्प्रेस परिणाम! तिन्ही रेल्वे मार्गावर विशेष ब्लॉक; अनेक सेवा रद्द होणार, कसे असेल वेळापत्रक?

Sangli Crime: रेल्वे मालधक्क्यावर हमाली वर्षाला २० कोटी, हमाल नेत्याच्या नातवाच्या खुनामागे वर्चस्ववादाचे मूळ; घाम गाळायचे क्षेत्र रक्ताने डागाळले

Viral Video: TMC नेता BJP मध्ये सामील व्हायला आला; पण भाजप कार्यकर्ता संतापला, चेहऱ्याला हिरवा रंग फासून बाहेर काढलं

SCROLL FOR NEXT