Prahar strike warning for farmers compensation solapur samadhan hembade sakal
सोलापूर

Solapur News : शेतकऱ्यांच्या मोबादल्यासाठी 'प्रहार'चा आंदोलनाचा इशारा

बाधीत शेतकऱ्यांसाठी प्रहार संघटना मैदानात उतरली

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : तालुक्यातील खोमनाळ,फटेवाडी,भाळवणी या भागातुन महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या 132 के.व्ही उपकेंद्रासाठी गेलेल्या विद्युत वाहिनीच्या तारेखालील झाडांचा मोबदल्यापासून अनेक शेतकरी 2018 पासून वंचीत असून पंधरा दिवसात न्याय नाही भेटला तर मंगळवेढा उपविभागीय कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलनासह आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा प्रहार चे मंगळवेढा तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी दिला.

यावेळी बाधित शेतकरी विठ्ठल सरवदे, रावसाहेब बिले ,भाळवणीचे महादेव साखरे प्रहार चे मंगळवेढा तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, उपाध्यक्ष रोहिदास कांबळे, तानाजी पवार यांनी निवेदन दिले आहे जर उपविभागीय अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले तर प्रहार चे अनोखे पुन्हा एकदा प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत काही शेतकऱ्यांना मोबादला मिळालेला आहे काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही.

पंचनामे झाले पण जे शेतकरी 2018 पासून मोबदल्यापासून वंचित आहेत खोमनाळ येथील सरवदे हे शेतकरी गेली अनेक वर्षे झाले विद्युत पारेषणच्या कार्यालयाला भेट देवून मोबदला कधी देणार अशी विचारणा करून पाठपुरावा करतात परंतु तेथील अधिकारी या शेतकऱ्यांना न्याय देत नाही.हेलपाट्याने त्रस्त करून सोडतात.शेवटी वैतागून त्यांनी प्रहार संघटने कडे धाव घेतली आता निवेदन दिले आहे नाहीतर वेळ पडली तर पारेषण कंपनीची विद्युत वाहिनी शेतकऱ्यांबरोबर बंद पाडू असा इशारा प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी दिला.

बाधीत शेतकऱ्यांसाठी प्रहार संघटना मैदानात उतरली आहे जोपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत या शेतकऱ्यांसाठी आ . बच्चू कडू यांची प्रहार संघटना शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रहार संघटना ठामपणे उभी आहे.

- समाधान हेंबाडे,तालुकाध्यक्ष प्रहार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Railway : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या विस्ताराला ब्रेक? मळगावातील प्रस्तावित बांधकामाविरोधात प्रवासी संघटना आक्रमक, 'त्या' निर्णयामुळे भविष्यातील विस्तार होणार कठीण?

पाठदुखीला साधं समजू नका! असू शकतं ‘या’ कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण; इतर संकेतही वेळीच ओळखा

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

SCROLL FOR NEXT