prakash ambedkar over ask political leaders about maratha obc reservation case Sakal
सोलापूर

Prakash Ambedkar : आरक्षणाच्या भूमिकेविषयी राजकीय नेत्यांना जाब विचारा; प्रकाश आंबेडकर

Reservation Case Latest news : सध्या आरक्षणाविषयी राजकीय पक्षांची भूमिका अतिशय घातक आहे. कोणताही पक्ष ओबीसी आरक्षणाविषयी उघडपणे बोलत नाही.

दत्तात्रय खंडागळे :

सांगोला : सध्या आरक्षणाविषयी राजकीय पक्षांची भूमिका अतिशय घातक आहे. कोणताही पक्ष ओबीसी आरक्षणाविषयी उघडपणे बोलत नाही. या राजकीय पक्षांना त्यांच्या भूमिकेविषयी आपण जाब विचारला पाहिजे. आजच्या परिस्थितीत राजकीय मतभेद असले तरी कोणीही सामाजिक मतभेद ठेवू नये असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा शनिवार (ता. 27) रोजी सांगोल्यात आली होती. यावेळी सांगोला येथे झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी त्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून सर्वच राजकीय पक्षांना धारेवर धरले. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील यांच्या भूमिकेमुळे ओबीसी आरक्षणाचा तिढा निर्माण झाला आहे.

ओबीसी आरक्षण प्रश्नावरून कोणताही राजकीय पक्ष ठोस भूमिका घेत नाही. परंतु या परिस्थितीचा राजकीय फायदा मात्र घेऊ पाहत आहेत. आरक्षणाबाबत राजकीय पक्षांची ही भूमिका घातक आहे. कोणीही उघडपणे आपली भूमिका मांडताना दिसत नाहीत.

अशा राजकीय पक्षांना, नेत्यांना आपण जाब विचारला पाहिजे. तुम्ही प्रत्येकातच राजकारणातून बघणार आहात का ? राजकीय फायद्यासाठी फुले, शाहू, बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांचे नाव फक्त घेता.

या महान व्यक्तींनी कधीही निर्णय घेत असताना मी कुठल्या समाजाचा आहे याचा विचार केला नाही. तसेच निर्णयानंतर माझा समाज विरोधात जाईल का याचा विचारही केला नाही. त्यांनी लोकहित व राज्यहित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला.

आजची राजकीय परिस्थिती अशी राहिली नाही. नेते सर्वच गोष्टी राजकारणाच्या ओळीत आणत आहेत. ओबीसी आरक्षण काढून घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. आरक्षण आम्हाला नाही तर कोणालाच नाही अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे.

ओबीसींनी राजकीय चेहरा निर्माण करणे आज गरजेचे आहे. राजकीय मतभेद असले तरी सामाजिक मतभेद कोणी ठेवू नये. त्याचा फायदा राजकीय नेते घेत आहेत. यासाठी नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे असा उपदेशही प्रकाश आंबेडकर यांनी दिला. या सभेसाठी विविध संघटनेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: मुंबईत गाडी चालवणं महागणार? 'वाहतूक कोंडी कर' लावण्याचा राज्य सरकारकडे प्रस्ताव; कुणाकडून आणि किती पैसे आकारणार?

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: कोकणात महायुतीचे 'शक्तीप्रदर्शन'

Sambhaji Nagar ZP Results: छ. संभाजी नगरमध्ये महायुतीच! वाचा संपूर्ण विजयी उमेदवारांची यादी

राघु पिंजऱ्यात आला...! सुकन्या मोनेचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Ambasan Farmers Protest : बिबट्याची दहशत आणि महावितरणची दिरंगाई; अंबासनचे शेतकरी सोमवारपासून 'अन्नत्याग' उपोषणावर!

SCROLL FOR NEXT