Shinde Canva
सोलापूर

शहरातील प्रश्‍नांवर प्रणिती शिंदे व संजय शिंदे पुन्हा आमने-सामने !

शहरातील प्रश्‍नांवर प्रणिती शिंदे व संजय शिंदे यांच्यात पुन्हा स्पर्धा लागली आहे

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील प्रश्‍नांच्या माध्यमातून आमदार संजय शिंदे (MLA Sanjay Shinde)) हे महापालिकेच्या राजकारणात लक्ष घालत असल्याची चर्चा आहे. ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर यात्रा, पदवीधर व शिक्षक आमदारकीची निवडणूक आणि आता लॉकडाउनचे (Lockdown) निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात त्यांनी लक्ष घातले आहे. दुसरीकडे, संजय शिंदे यांच्यामुळे शहरातील कॉंग्रेसचे अस्तित्व धोक्‍यात येणार नाही ना, याची खबरदारी घेत शहरातील प्रश्‍नांवर आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यादेखील आवर्जून लक्ष देत आहेत. (Praniti Shinde and Sanjay Shinde are competing again on issues in the Solapur city)

महापालिकेत सध्या भाजपची (BJP) सत्ता असून, यापूर्वी कॉंग्रेस (Congress) - राष्ट्रवादी कॉंग्रेसची (NCP) सत्ता होती. मात्र, संख्याबळात कमी पडल्याने राष्ट्रवादीच्या वाट्याला मागील काही वर्षांत महापौरपद मिळाले नाही. याची सल राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनात कायम आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आगामी निवडणुका एकत्रित झाल्यास त्यात सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादीचेच असावेत, यादृष्टीने आमदार संजय शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. एमआयएमचे (MIM) तौफिक शेख (Taufiq Shaikh) यांना राष्ट्रवादीमध्ये घेण्याबाबतीत आमदार संजय शिंदे यांचाच मोलाचा वाटा राहिला आहे.

संजय शिंदे यांची शहरातील एन्ट्री कॉंग्रेसच्या जिव्हारी लागणारीच आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मोठा भाऊ असल्याचे पुन्हा एकदा दाखवून देण्याच्या दृष्टीने आमदार प्रणिती शिंदे यांचे प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा आहे. आता तर त्यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची धुरा देण्यात आली असल्याने त्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे संजय शिंदे हे शहरातील ज्या प्रकरणात लक्ष घालतात, त्या प्रकरणात आवर्जून आमदार प्रणिती शिंदे यांनी लक्ष घातल्याचे आतापर्यंत पाहायला मिळाले आहे. आता शहरातील व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांची सर्व दुकाने सुरू करण्यासंदर्भात आमदार संजय शिंदे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला आहे. तर आमदार प्रणिती शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी संवाद साधला. त्यामुळे आता सकारात्मक निर्णय झाल्यास तो कोणामुळे झाला, याचा श्रेयवाद सुरू होईल, अशीही चर्चा आहे.

पालकमंत्र्यांवर भरोसा नाही का?

वास्तविक पाहता जिल्ह्यातील विविध प्रश्‍न, अडचणींसंबंधी स्थानिक लोकप्रतिनिधी सर्वप्रथम पालकमंत्र्यांशी चर्चा करतात, असा अलिखित प्रोटोकॉल मानला जातो. मात्र, बहुतेक नेत्यांचे एकमेकांशी जमत नसल्याने ते आपापल्या नेत्यांशी थेट संपर्क करतात, असाही अनुभव अनेकदा आला आहे. आताही तसाच अनुभव येऊ लागला असून एका आमदाराने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तर दुसऱ्या आमदाराने थेट राज्याच्या मुख्य सचिवांनाच संपर्क केला. त्यामुळे उजनीच्या पाण्यावरून बॅकफूटवर गेलेल्या पालकमंत्र्यांशी दोन्ही आमदारांनी संपर्क साधला नसल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20 World Cup 2026 Squad Announce : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिलचा पत्ता कट, उप कर्णधार बदलला; इशान किशनही परतला

Shivaji University Protest Violence : ब्रेकिंग! शिवाजी विद्यापीठात एबीव्हीपीच्या आंदोलनाला हिंसक वळण; पोलिस-विद्यार्थींमध्ये झटापट, घटनेचा व्हिडिओ व्हायरल...

Honor Killing Case : 40 वर्षाच्या तरुणाचं 19 वर्षाच्या तरुणीवर प्रेम; मुलीच्या घरात कळताच बापानं गाडीतच गळा चिरून केली प्रियकराची हत्या

Mumbai News: मद्य परवानगीवर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह, धोरणाबाबत पुनर्विचार करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : राष्ट्रीय तपास संस्थेने महाराष्ट्रातील दिनेश पुसू गावडे हत्या प्रकरणात आणखी दोन फरार आरोपींना अटक केली

SCROLL FOR NEXT