सोलापूर

Solapur Lok Sabha Election 2024 : तुमचंही सोलापुरात स्वागत...; भाजपकडून राम सातपुतेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रणिती शिंदेंचा टोला

Solapur Lok Sabha Election 2024 : सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Solapur Lok Sabha Election 2024 : सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्विट करून राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वागत केले आहे.

राम सातपुते यांच्या उमेदवारीवर मत व्यक्त करताना प्रणिती शिंदे यांनी सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा असून इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते. मग तो इथला असो किंवा बाहेरचा सोलापूरची लेक म्हणून मी तुमचं सोलापुरात स्वागत करते, अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांना उपरोधिक टोला लगावला आहे.

तसेच पुढील ४० दिवसात लोकांचे प्रश्न आणि विकासाचे मुद्दे याचं भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करु शकतो यावर लढाई लढू, अशी फटकेबाजीही त्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून सातपुतेंवर केली आहे.

तसेच ही निवडणूक लोकशाहीच्या मार्गाने लढवू या आणि सशक्त लोकशाहीची चुणूक दाखवूया असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना आव्हान दिले आहे. प्रणिती शिंदे यांच्या या ट्विटमुळे आता खऱ्या अर्थाने सोलापुरात राजकीय धुळवड सुरू झाल्याचे चित्र दिसून आले आहे. दरम्यान आगामी काळात राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यामध्ये ट्विटर वार रंगताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकतर्फी प्रेमाचा थरारक शेवट! 18 वर्षीय विद्यार्थ्यानं सॉफ्टवेअर अभियंता शर्मिलाचा केला खून; बेडरूममधील कपड्यांचा ढीग ठरला पुरावा

inspiring Story: कचरा वेचक प्रामाणिक हातांना ‘शिवम’चे कोंदण; हृदयस्पर्शी सन्मानाने सार्थक झाल्याचे अंजू मानेंची भावना, पाणावल्या डोळ्यांच्या कडा!

Latest Marathi News Live Update: शेत रस्त्याच्या वादातून दोघांना कुऱ्हाड आणि खोऱ्याच्या दांड्याने मारहाण

MP Nitin Patil: दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढण्याची कार्यकर्त्यांची भावना: खासदार नितीन पाटील, राजकारण फिरू लागलं पैशाच्या भोवती!

Virat Kohli ने फलंदाजीत नेमका काय बदल केला? अश्विनने दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाला, 'तो आता फक्त...'

SCROLL FOR NEXT