precision solapur open tennis tournament sahaja yamalapalli ekaterina makarova saki imamura diana marchivika Sakal
सोलापूर

Precision Solapur Open Tennis : सहजा, मर्सिचेविका, एकतेरिना, साकी उपांत्य फेरीत

प्रिसिजन ओपन टेनिस स्पर्धा; दुहेरीत जपानच्या जोड्यांमध्ये अंतिम लढत

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : येथे सुरू असलेल्या महिला आयटीएफ प्रिसिजन ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताची सहजा यमलापल्ली, रशियाची एकतेरिना मकारोवा, जपानची साकी ईमामुरा, डायना मर्सिचेविका यांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

तर दुहेरी गटात जपानच्या हिरोमी आबे व साकी इमामुरा ही जोडी जपानच्या फुना कोनाकी व मिसाका मासूदा यांच्यात अंतिम सामना होणार आहे. एमएसएलटीए टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत भारताच्या सातव्या मानांकित सहज यमलापल्ली हिने जपानच्या हिरोमी आबेचा ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

लात्वियाच्या सहाव्या मानांकित डायना मार्सिचेविकाने ग्रीसच्या तिसऱ्या मानांकित सॅपफो साकेल्लारिडीचा ६-४, ६-३ असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. जपानच्या साकी इमामुराने रशियाच्या डारिया कुडाशोवाचे आव्हान ६-३, ६-४ असे संपुष्टात आणले. दुसऱ्या मानांकित रशियाच्या एकतेरिना मकारोवाने भारताच्या आठव्या मानांकित वैदेही चौधरीचा ६-३, ६-३ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

दुहेरीत उपांत्य फेरीत जपानच्या फुना कोजाकी व मिसाकी मात्सुदा या जोडीने रशियाच्या तिसऱ्या मानांकित एकतेरिना काझिओनोवा व एकतेरिना याशिना यांचा ७-६(६), ६-० असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

दुसऱ्या सामन्यात जपानच्या हिरोमी आबेने साकी इमामुराच्या साथीत वैष्णवी आडकर व सहजा यमलापल्ली यांचा ६-४, ६-१ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

एकेरीचे आज होणारे उपांत्य सामने

सहजा यमलापल्ली (भारत) विरुद्ध साकी ईमामुरा (जपान)

डायना मर्सिचेविका (लात्स्विया)विरुद्ध एकतेरिना मकारोव्हा (रशिया)

मुख्य ड्रॉ :उपांत्यपूर्व फेरी : एकेरी महिला

सहजा यमलापल्ली (भारत) वि. वि. हिरोमी आबे (जपान) ६-३, ६-२

एकतेरिना मकारोवा(रशिया)वि. वि. वैदेही चौधरी (भारत) ६-३, ६-३

डायना मार्सिचेविका(लात्विया) वि. वि. सॅपफो साकेल्लारिडी (ग्रीस) ६-४, ६-३

साकी इमामुरा(जपान) वि. वि. डारिया कुडाशोवा ६-३, ६-४

दुहेरी गट : उपांत्य फेरी

हिरोमी आबे(जपान) व साकी इमामुरा (जपान) वि. वि. वैष्णवी आडकर (भारत) व सहजा यमलापल्ली (भारत) ६-४, ६-१

फुना कोजाकी (जपान) व मिसाकी मात्सुदा (जपान) वि. वि.एकतेरिना काझिओनोवा व एकतेरिना याशिना(रशिया) ७-६(६), ६-०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

SCROLL FOR NEXT