CKL21B00950.jpg
CKL21B00950.jpg 
सोलापूर

केळीचा दर पोहचला सोळा रुपये किलोवर  करमाळा तालुक्‍यातून दररोज तीनशे टन केळीची निर्यात 

गजेंद्र पोळ


चिखलठाण (ता.करमाळा) : करमाळा तालुक्‍यातील दर्जेदार व गुणवत्तापूर्ण केळीला आखाती देशात मागणी वाढल्याने सध्या तालुक्‍यातील केळी उत्पादकांना पंधरा ते सोळा रूपये प्रतीकिलो दर मिळत असून तालुक्‍यातून दररोज अडीचशे ते तीनशे टन केळीची निर्यात होत आहे. 
कर्नाटक आंध्र प्रदेशात सध्या केळी उपलब्ध नसल्यामुळे व जळगाव जिल्ह्यातील केळीच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातील केळीला निर्यात कंपन्यांची अधिकची पसंती असल्याने तालुक्‍यातून दररोज पस्तीस ते चाळीस वाहानांमधून अडीचशे ते तीनशे टन केळी परदेशात पाठवली जात आहेत. याशिवाय देशांतर्गत बाजारपेठेतही तालुक्‍यातील केळी मोठ्या प्रमाणावर जात असल्याने गेल्या महिन्यात सात ते आठ रूपये किलो आसणारा दर पंधरा ते सोळा रूपायावर पोहचला असून तालुक्‍यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळू लागल्याने केळी उत्पादकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. 

करमाळा तालुक्‍यात पाच हजार हेक्‍टर क्षेत्रावर केळीची लागवड झाली असून वर्षभरात सव्वा ते दीड लाख टन केळी उत्पादन मिळणार आहे. तालुक्‍यातील केळीला ओमान, दुबई, इराण, इराक, अफगाणिस्तान या देशात मागणी मोठ्या प्रमाणावर असून गेल्यावर्षी लॉकडाउन काळात विस्कळीत झालेली निर्यात सुरळीत झाल्याने गेली एक वर्षभर अडचणीत असलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.तालुक्‍यातून महिंद्रा, देसाई फ्रुट, आय.एन आय सह्याद्री फार्म नाशिक, एस.के कंपनी कोल्हापूर, के.डी.एक्‍सपोर्ट कंदर यासह अनेक एक्‍सपोर्ट कंपन्या शेतकऱ्यांकडून खरेदी करून केळी निर्यात करत आहेत. देशांतर्गत बाजारपेठेतही चांगली मागणी असल्याने सध्या चांगला दर मिळतो आहे त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. 

करमाळा तालुक्‍यात उजनी धरण काठाच्या भागात वर्षभर निर्यातक्षम केळीची उपलब्धता असल्याने तालुक्‍यात अनेक निर्यात कंपन्यांनी आपली कार्यालय सुरू केली असून केळी खरेदी सुरू आहे. स्पर्धा वाढल्याने केळी उत्पादकांनाही चांगला दर मिळू लागला आहे .पुढील काळातही दर टिकून राहाण्याची शक्‍यता आहे.उत्पादकांनी उत्पादन वाढीबरोबर दर्जा व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केला पाहिजे. 
शुभम देशमुख, केळी निर्यात कंपनी, प्रतिनिधी (वांगी ता करमाळा ) 

सध्या केळीची मागणी वाढल्याने चांगला दर मिळू लागला आहे परंतु गेल्या दोन महिन्यांपूर्वी चिलींगचे कारण देत मागणीअभावी केळी जागेवरच सडून जात होती त्यावेळी दर फारच पडले होते आम्ही केळी दर्जेदार पिकवतो परंतु दर टिकून राहत नाहीत यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. 
- नानासाहेब साळुंके, शेतकरी, नागनाथ शेतकरी गट शेटफळ 

संपादन : अरविंद मोटे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar Constituency Lok Sabha Election Result: ना जलील ना खैरे ऑन्ली भूमरे, वादांच्या भोवऱ्यात अडकूनही शिंदे गटाने मिळवला मोठा विजय

Satara Lok Sabha Result: तुतारीसारख्या दिसणाऱ्या चिन्हाने शशिकांत शिंदेचा केला घात...साताऱ्यात नेमकं काय घडलं?

Social Media Reaction: निवडणुकीच्या निकालांमुळे शेअर बाजार कोसळला; सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस

India Lok Sabha Election Results Live : गुजरातच्या बालेकिल्ल्याला काँग्रेसने पाडले भगदाड! भाजपच्या क्लीनस्वीपच्या स्वप्नाला कोणी फेरले पाणी? 

Maharashtra Lok Sabha Election Results Live : बीडमध्ये पंकजा मुंडे विजयाच्या दिशेने, तब्बल ७५ हजार मतांचं लीड

SCROLL FOR NEXT