वांग्याचे भाव पोहोचले १०० रुपयांवर sakal
सोलापूर

सोलापूर : वांग्याचे भाव पोहोचले १०० रुपयांवर

आवक घटली; उत्पादकांना अवकाळीचा फटका

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : भरपूर भाज्या (vegetables)उत्पादनाचा हंगाम असतानादेखील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने सर्वच फळभाज्या उत्पादनाला किडीचा फटका बसला आहे. त्यासोबत आवकही कमी झाल्याने किरकोळ बाजारात वांग्याचे भाव चक्क प्रतिकिलो १०० रुपयांवर पोहोचले आहेत. पंधरवड्यापूर्वी अचानक थंडी गायब होऊन आभाळी वातावरण झाले होते. त्यासोबत काही भागात पाऊसदेखील (rain) झाला. त्याचा फटका भाजी उत्पादनाला बसला आहे. हिवाळ्यात भरपूर भाज्यांची (vegetables)आवक होत असली तरी यावेळी अवकाळी पावसाने चित्र बदलले आहे.

बहुतांश फळभाज्यांचे या पावसाने नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाल्याने थेट उत्पादन कमी झाले. त्यातही वांग्याचे उत्पादन किडीने सर्वाधिक प्रभावित झाले. फळ धरतानाचा हे नुकसान झाले. टोमॅटोच्या पिकाला किडीचा फटका आधीपासूनच होता. वांगी किडकी झाल्याने यार्डात येणारा मालदेखील बऱ्यापैकी किडका होता.

त्यामुळे पन्नास किलोमागे किडक्‍या मालाचे वजन दहा किलोपर्यंत भरत होते. व्यापाऱ्यांनी दहा किलो नुकसानीची भर उर्वरित मालाच्या किमतीत वाढवल्याने भाव आणखी वाढले. कारण ग्राहक वांगी निवडून घेत असल्याने किडका माल थेट फेकून देण्याशिवाय पर्याय नव्हता. कीड लागल्याने झालेले नुकसान व आवक घटल्याचा दुुहेरी फटका बसला आहे. याशिवाय इतर फळभाज्या अवकाळीच्या फटक्‍यात सापडल्याने त्यांची आवक घटली आहे. त्यामुळे भोपळा, घेवडा, दोडका, कारले, ढब्बू मिरची आदी फळभाज्यांचे भाव ७५ ते ८० रुपये किलोवर पोहोचले आहेत.त्या तुलनेत पालक, मेथी, कांदापात, राजगिरा, घोळ, चुका, शेपू आदी पालेभाज्या स्वस्त असल्याने ग्राहक त्याची खरेदी करत आहे. याशिवाय बटाटा २० रुपये किलो असल्याने त्याची खरेदी ग्राहक करत आहेत. तसेच फ्लॉवर व पत्ताकोबीचे भावदेखील चढेच आहेत.

ठळक बाबी

  • अवकाळीचा उत्पादकांना फटका

  • किडक्‍या मालामुळे व्यापाऱ्यांकडून भाववाढ

  • इतर फळभाज्यांची आवक कमी असल्याने भाव तेजीत

  • पालेभाज्या व बाटाटे मात्र स्वस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trending News : AI ची कमाल ! महिलेला मिळाला २५ वर्षांपूर्वी गेलेला आवाज, नेमका कसा घडला चमत्कार?

Joint Pain: पावसाळ्यात सांधेदुखी का वाढते? जाणून घ्या उपचार कसे करावे

Latest Marathi News Updates : जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी एक क्विंटलचा फुलांचा हार

Online Shopping Discount : कपडे अन् इतर वस्तू सगळ्यात स्वस्त कुठे मिळतात? तुमच्याचं फायद्याचं आहे, पाहा एका क्लिकवर..

Crime News : हुंड्यासाठी पत्नीला मुलासमोर जिवंत जाळलं, पतीचा एन्काउंटर; पोलिसांनी झाडली गोळी

SCROLL FOR NEXT