Prices eaten by domestic than foreign, sold at three times the rate 
सोलापूर

विदेशीपेक्षा देशीने खाल्ला भाव, तिप्पट दराने विक्री 

प्रशांत काळे

बार्शी (जि. सोलापूर) : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रत्येक नागरिकाच्या जीवाची काळजी घेण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने आपत्कालीन कायदा व संचारबंदी लागू करुन लाकडाउन सुरू केले खरे पण तळीरामांची भूक सध्या दुप्पट, तिप्पट किंमतीने मद्याची बाटली घेऊन भागवली जात आहे. हातभट्टीलाही चांगले दिवस आले आहेत. तर तालुक्‍यात बीअरचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. 

एक महिना उलटला तरी राज्यातील देशी-विदेशी दारूचे वाईन शॉप, बीअर शॉपी, बार ऍन्ड रेस्टारंट पूर्णपणे बंद आहेत. याचाच फायदा सध्या बार्शी शहर व तालुक्‍यात घेतला जात असून तळीरामांची भूक सध्या मागेल ती किंमत देऊन भागवली जात आहे. लॉकडाउनची तारीख वाढली अन्‌ दुप्पटचा भाव तिप्पट झाला. देशी दारूची बाटली अवघ्या 52 रुपांयांची शासकीय किंमत असताना सध्या दीडशे रुपये आकारले जात आहेत तर दीडशे रुपयांच्या बाटलीची किंमत चारशे रुपये झाली आहे. हातभट्टीचा कच्चा माल उपलब्ध होत असल्याने तिथेही मोठी चलती सुरू आहे. 
सगळीकडे लॉकडाउन असल्यामुळे हॉटेल, धाबे बंद आहेत. दारू मिळते खरी पण त्याचे सेवन कोठे करायचे हा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे, घरी कुटुंबासमोर कशी घ्यायची, त्यामुळे अनेकांच्या शेतामध्ये वीटा बांधून चूल तयार करुन मासांहरी जेवण तयार करुन ताव मारण्यात येत आहे. कधीही आत्तापर्यंत मिळाली नव्हती व यापुढे कधीही अशी सुटी जीवनात मिळणार नाही याचा आनंद घेतलाच पाहिजे अशी चर्चा अनेकांत रंगत आहे. 
सध्या शहरात बीअरचा मोठा सुळसुळाट असून दीडशे रुपयांची बिअर चारशे रुपयांना तर दोनशेची पाचशे रुपयांना विक्री होत आहे. विदेशी दारुही अनेकांना उपलब्ध होत आहे. ही दारू नेमकी कोठून येते हा संशोधनाचा विषय असून उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना हे मोठे आव्हानच आहे. 
अजूनही करोना संसर्गाची परिस्थिती अटोक्‍यात आली नाही तर शहरात अवैधपणे दारू विक्रीचे भाव गगनाला पोहचली आहे. पण ज्यांना त्याची सवय झाली आहे ते वाट्टेल त्या किंमतीत खरेदी करतील, असा विक्रेत्यांचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT