भाज्यांचे दर sakal
सोलापूर

दररोजच्या जेवणातील भाज्यांचे दर स्थिर! लसणाची फोडणी महागली; जाणून घ्या, कांदा, पालक, टोमॅटो, शेपू, दोडका, बटाटा, मेथी, भेंडी, हिरवी मिरची, वांगी, कारले, कोथिंबीरचे भाव

सोलापूर जिल्हाभरात चांगला पाऊस झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली असून सध्या बाजारातील भाजीपाल्याचे दर स्थिर असल्याचे चित्र आहे. पण, लसणाची फोडणी महागली असून लसणासाठी एक किलोला २८५ ते ३०५ रुपये मोजावे लागत आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हाभरात चांगला पाऊस झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली असून सध्या बाजारातील भाजीपाल्याचे दर स्थिर असल्याचे चित्र आहे. पण, लसणाची फोडणी महागली असून लसणासाठी एक किलोला २८५ ते ३०५ रुपये मोजावे लागत आहेत.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पालक, टोमॅटो, शेपू, दोडका, बटाटा, कांदा, मेथी, भेंडी, हिरवी मिरची, कोथिंबीर, वांगी, कारले, गवार अशा भाजीपाल्यांचे दर शेतकऱ्यांना अपेक्षित, असे वाढलेले नाहीत. ग्राहकांना परवडतील, असे दर सोलापूर बाजार समितीत विक्री केलेल्या भाजीपाल्यांचे आहेत. पण, किरकोळ बाजारात हा दर काहीसा वाढलेला पाहायला मिळतो.

दरम्यान, आता शेतकऱ्यांची कांदा लागवडीची लगबग सुरू असून उडीद काढल्यानंतर काही शेतकऱ्यांनी भाजीपाला तर बहुतेक शेतकऱ्यांना त्याठिकाणी कांद्याचीच लागवड करायला सुरवात केली आहे. चालू हंगामात कांद्याला चांगला दर मिळेल आणि सर्व अडचणी दूर होतील, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. दरम्यान, आणखी दीड-दोन महिन्यात पुन्हा भाजीपाल्याचे दर काही प्रमाणात वाढतील, अशी सद्य:स्थिती आहे.

सोलापूर बाजार समितीतील भाव

  • भाजीपाला प्रतिकिलो दर

  • टोमॅटो २० ते ३५ रुपये

  • दोडका २२ ते ४० रुपये

  • बटाटा २३ ते ३० रुपये

  • वांगी २० ते ४० रुपये

  • कारली २० ते ३० रुपये

  • गवार ४० ते ६५ रुपये

  • भेंडी १२ ते २५ रुपये

  • लसूण २८५ ते ३०५ रुपये

  • हिरवी मिरची १५ ते २० रुपये

  • पालक ५ ते ८ रुपये पेंडी

  • मेथी १३ ते २० रुपये पेंडी

  • कोथिंबीर ५ ते ८ रुपये पेंडी

  • शेपू ८ ते १० रुपये पेंडी

पावसामुळे कांद्याचा दर ३०० रुपयांनी घटला

मागील तीन दिवसांपासून विविध राज्यांमध्ये पाऊस पडत असल्याने सोलापूर बाजार समितीतून कांदा घेऊन मद्रास, बंगळूर याठिकाणी जाणाऱ्या गाड्या वाटेत थांबून थांबून जात आहेत. शेतमाल उतरविल्यावर तेथून यायला देखील गाड्यांना वेळ लागत आहे. त्यामुळे सोलापूर बाजार समितीत मंगळवारी (ता. २४) कांद्याचे दर प्रतिक्विंटल ३०० रुपयांनी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी १७७ गाड्या कांद्याची आवक होती. साडेचार ते पाच हजार रुपयांचा दर नोव्हेंबरपर्यंत राहील, असा अंदाज बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. आवक वाढल्यानंतर पुन्हा डिसेंबरपासून दर कमी होवू शकतात, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

IPL 2026: 'तो' ड्रेसिंग रूममधून पळत आला, डेव्हिड मिलरला फलंदाजीला जाण्यास रोखले अन्... DC च्या डग आऊटमधील Video Viral

SCROLL FOR NEXT