solapur zp sakal media
सोलापूर

प्राथमिक शिक्षणाधिकारी जावीर म्हणाले, मी उपशिक्षणाधिकारी म्हणून उत्तम काम करू शकेन; सोडला शिक्षणाधिकारीचा पदभार

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभारी पदभार संजय जावीर यांनी आज अखेर सोडला. तत्कालिन शिक्षणाधिकारी किरण लोहार हे कार्यालयात लाच घेताना आढळल्यानंतर प्रभारी शिक्षणाधिकारीपदाची जबाबदारी जावीर यांच्यावर आली होती.

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभारी पदभार संजय जावीर यांनी आज अखेर सोडला. तत्कालिन शिक्षणाधिकारी किरण लोहार हे कार्यालयात लाच घेताना आढळल्यानंतर प्रभारी शिक्षणाधिकारीपदाची जबाबदारी जावीर यांच्यावर आली होती. तब्बल नऊ महिने नऊ दिवस जावीर यांनी प्राथमिकचे प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेची सुत्रे हाती घेतल्यापासून प्राथमिक शिक्षण विभागातील विषय अजेंड्यावर घेतले आहेत. हद्दवाढ भागासह जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील धोकादायक वर्ग खोल्यांचा विषय असो की शालेय पोषण आहारमधील खिचडीची चव असो यासह प्रत्येक लहान-सहान बाबी त्या स्वत: पडताळून घेत आहेत. २०१९ नंतर जिल्हा परिषदेच्या मराठी व कन्नड माध्यमातील ८ हजार ८९२ शिक्षकांच्या बिंदुनामावली (रोस्टर) पडताळणीचे कामे त्यांनी युध्द पातळीवर हाती घेतले आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील जवळपास चौदा जणांचे पथक बिंदुनामावलीची प्रक्रिया पूर्ण करत आहे. ‘वेळेत काम करा अन्यथा कारवाईला सामोरे जा’ असाच मेसेज सीईओ आव्हाळे यांनी दिल्याने जिल्हा परिषदेतील यंत्रणा बऱ्याच वर्षानंतर अलर्ट झाली आहे. संजय जावीर यांची मुळ नियुक्ती प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी म्हणून आहे. त्यांनी नोंव्हेंबर २०२२ पासून प्रभारी शिक्षणाधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे.

टप्पा अनुदानाचा विषय असो की मुख्याध्यापक पदोन्नती यामध्ये जावीर यांची कामगिरी प्रभावी राहिली आहे. उपशिक्षणाधिकारी म्हणून मी आणखी प्रभावीपणे काम करेल, माझ्याकडून प्रभारीची जबाबदारी काढून घ्या अशीच विनंती त्यांनी सीईओ आव्हाळे यांना केली होती. त्यानूसार जावीर यांनी आज प्रभारीची जबाबदारी सोडली आहे.

जबाबदारी फडकेंवर की वठारेंवर
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात संजय जावीर यांच्या माध्यमातून सध्या एकमेव उपशिक्षणाधिकारी कार्यरत आहेत. माध्यमिक शिक्षण विभागात मारुती फडके यांच्या रुपाने शिक्षणाधिकारी व तृप्ती अंधारे यांच्या रुपाने एक उपशिक्षणाधिकारी कार्यरत आहेत. योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी म्हणून सुलभा वठारे कार्यरत आहेत. जावीर यांनी पदभार सोडल्यानंतर प्राथमिकच्या प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांची जबाबदारी कोणावर येणार? फडके यांच्यावर की वठारे यांच्यावर याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT