0College_1.jpg 
सोलापूर

महाविद्यालये सुरु करण्याचा प्राचार्यांना अधिकार ! वसतिगृहांना अद्यापही टाळेच; गैरहजर विद्यार्थ्यांचीही लागणार हजेरी

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाच्या सावटातून बाहेर आलेले जनजीवन आता पूवर्वत झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर उद्यापासून (सोमवारी) राज्यभरातील साडेपाच हजार महाविद्यालये सुरु होणार आहेत. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍त यांच्याशी चर्चा करुन महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात परवानगी घ्यावी, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले. मात्र, विद्यापीठांनी अंग काढून घेत महाविद्यालये सुरु करण्याचा अधिकार संबंधित महाविद्यालयांचा प्राचार्यांना देऊन टाकला आहे.

कोरोनाच्या नियमांची काळजी घ्यावी
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आदेशानुसार उद्यापासून (सोमवारी) महाविद्यालये सुरु होतील. महाविद्यालये सुरु करण्याचा संपूर्णत: अधिकार प्राचार्यांना देण्यात आला असून त्यांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. महाविद्यालयात किमान 30 ते 50 टक्‍केच विद्यार्थी उपस्थित राहतील, याची दक्षता त्यांनी घ्यावी. 
- डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरु, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे महाविद्यालयात तासांसाठी किमान 30 ते 50 टक्‍के विद्यार्थी एकावेळी बोलवावेत. दुसऱ्या दिवशी अथवा दुसऱ्या सत्रात उर्वरित विद्यार्थ्यांचे अध्यापन करावे, अशा सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. महाविद्यालयात येताना संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र घेण्याची आवश्‍यकता नाही. ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात यायचे आहे, त्यांनी यावे, अशी नियमावली पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने यापूर्वीच जाहीर केली आहे. दुसरीकडे कोरोनाच्या भितीने महाविद्यालयात न येणारा विद्यार्थी गैरहजर दाखवू नये, असेही विद्यापीठाने महाविद्यालयांना स्पष्ट केले आहे. दरम्यान, अनेक महाविद्यालयांचे व विद्यापीठांमधील विद्यार्थी वस्तीगृहे क्‍वारंटाईन सेंटरसाठी अधिग्रृहित केली होती. महाविद्यालये सुरु होणार असतानाही बहुतांश वसतिगृहांना टाळेच आहे.


ठळक बाबी...

  • महाविद्यालयांबाहेर प्रत्येकांचे होणार थर्मल स्क्रिनिंग
  • दोन सत्रात भरतील वर्ग; एकाच विषयावर प्राध्यापकांना करावे लागणार दोनदा अध्यापन
  • विद्यार्थ्यांना (50-50 टक्‍के) रोटेशन पध्दतीने महाविद्यालयात बोलवावे
  • कोरोनाबाधित अथवा ज्या विद्यार्थ्यांच्या घरात कोरोनाबाधित रुग्ण आहे, त्यांची करावी स्वतंत्र व्यवस्था
  • वसतिगृहांना टाळेच; तरीही वसतिगृहातील एका खोलीत राहणार एकच विद्यार्थी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

धोनीचा असा जल्लोष परत कधीचं पाहिला नाही! पहिला T20 World Cup जिंकल्यावरच्या सेलिब्रेशनचा Viral Video

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Congress MLA Resignation : मतदार संघात दुष्काळ जाहीर न केल्याने काँग्रेस आमदार पाटील यांचा राजीनामा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

SCROLL FOR NEXT