private doctors will have to be provided in a government hospital 
सोलापूर

खासगी डॉक्‍टरांची सेवा सर्वोपचार रुग्णालयात वर्ग

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर ः सोलापूर शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून आज नवीन सहा रुग्ण सापडले आहेत. कोरोना सोबतच सारी रोगाचेही रुग्ण सोलापुरात सापडले आहेत. त्यामुळे शहरातील खासगी डॉक्‍टरांची सेवा छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात वर्ग केल्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज घेतला.


खासगी डॉक्‍टरांसाठी वेळापत्रक निश्‍चित करण्यात आले असून या वेळापत्रकानुसार त्या डॉक्‍टरांना सोलापूरच्या सर्वोपचार रुग्णालयात सेवा द्यावी लागणार आहे. सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडे खासगी डॉक्‍टरांच्या सेवेचे नियोजन व समन्वय सोपविण्यात आले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हरीश रायचूर यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 

हे डॉक्‍टर्स होणार वर्ग 
डॉक्‍टर सर्वश्री गुरुनाथ परळे, रिझवान हक, अमजद सय्यद, शैलेश पाटील, अनुपम शहा, सत्यनारायण तोष्णीवाल, राहुल सोमानी, सुजित जहागीरदार, सूर्यप्रकाश कोठे, अमोल पाटील, संदीप होळकर, गजानन पिळगुलवार, पूनम बजाज, हरीश काकडे, फिरोज सय्यद, लतीफ शेख यांच्यासह पन्नासहून अधिक डॉक्‍टरांची सेवा सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय साठी वर्ग करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT