ncp 
सोलापूर

गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण, सोलापूर शहर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसचा उपक्रम 

प्रमोद बोडके

सोलापूर : यंदाच्या गणेशोत्सवावर जरी कोरोनाचे संकट असले तरीही महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्यावतीने गौरी गणपतीनिमित्त सजावट स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल आज जाहीर करुन विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात हा बक्षिस वितरण समारंभ झाला. युवती शहराध्यक्षा आरती हुळ्ळे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. 

यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, युवती शहराध्यक्षा आरती हुळ्ळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत सौ. स्वाती मुळे, या प्रथम आल्या आहेत. द्वितीय क्रमांक सौ. तनश्री घाडगे यांनी मिळविला आहे. तृतीय क्रमांक वेणू भोजने यांना मिळविला आहे. उत्तेजनार्थ म्हणून सौ. भारती सोलनकर आणि कविता बनसोडे यांना गौरविण्यात आले. विजेत्यांना भेटवस्तू प्रशस्तीपत्रक देण्यात आले. 

सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाचे जिल्हाप्रमुख मिलिंद गोरे, सोशल मीडिया कार्याध्यक्ष युवराज माने, राष्ट्रीय सरचिटणीस सायरा शेख, लता ढेरे, प्राजक्ता बागल, गौरा कोरे, सिया मुलाणी, युवतीच्या पदाधिकारी सुप्रिया लोमटे, सृष्टी आगरकर यांच्यासह स्पर्धेतील बक्षीस विजेते व स्पर्धक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uday Samant VS Narayan Rane : उदय सामंतांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर नारायण राणेंचा इशारा; कोकणात वाढली राजकीय खळबळ

Fatty Liver: तुमचं लिव्हर फॅटी आहे की नाही, घरबसल्या ओळखा; डॉक्टर सरीन यांनी सांगितल्या ट्रिक्स

Latest Marathi News Live Update : SRA ची मोठी कारवाई! मुंबईत अनधिकृत बांधकामांवर हातोडा

Corruption Case : हॉस्पिटल ते स्मशानभूमी, सगळीकडे मागितली लाच; मुलीच्या मृत्यूनंतर निवृत्त अधिकाऱ्याला भ्रष्टाचाराचा धक्कादायक अनुभव

IND vs AUS 2nd T20I Live : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बघा काय बदल झाला! अर्शदीपला मिळाली का संधी?

SCROLL FOR NEXT