सोलापूर

`या` महापालिकेतील शिवसेना नगरसेवकाची मुख्यमंत्र्याकडे धाव

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासन गंभीर नाही. लोकप्रतिनिधींनी या प्रकरणांत लक्ष घालू नये, असे खुद्द आयुक्तच म्हणत असल्याचा ठपका ठेवत शिवसेनेचे नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आयुक्तांविरुद्ध तक्रार केली आहे. तर , शहरात निर्माण झालेल्या स्थितीबाबत आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी कॉंग्रेसचे गटनेते चेतन नरोटे व वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आयुक्त दीपक तावरे यांच्याशी संपर्क साधला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. 

श्री. कोठे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे, कोरोनामुळे शहरात एकाचा मृत्यू झाला असून, एक महिला पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे शहरात घबराट निर्माण झाली आहे. मात्र महापालिका प्रशासन उपाय करण्यात अपयशी ठरले आहे. मरण पावलेल्या व्यक्तीच्या संपर्कात प्रभाग सातमधील काही नागरीक आले होते. त्या भागात निर्जंतुकरणाची मागणी त्यांनी केली, त्यानुसार आयुक्तांना सांगितले असता, आयुक्तांनी कार्यवाही तर केलीच नाही, उलट लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात लक्ष घालू नये असे उत्तर दिले. त्यामुळे आपल्याकडे तक्रार करावी लागल्याचे श्री. कोठे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. 

कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रामध्ये कोरोणा पॉझिटिव्ह मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे महापालिकेच्या माध्यमातून कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत त्याची माहिती नगरसेवकांना मिळणे आवश्‍यक आहे. तसेच लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सूचनांनुसार प्रशासनाने कार्यवाही करणे अपेक्षित आहे, अशी मागणी करीत पदाधिकारी व गटनेते यांच्या माध्यमातून महापालिका प्रशासन यांच्यामध्ये संयुक्त बैठक घेणे आवश्‍यक आहे. बैठकीच्या वेळी सोशल डिस्टन्स चा आधार घेत ही बैठक हिरवळीवर घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT