aap and praniti.jpeg 
सोलापूर

अधिवेशनात मांडा विज बिलाची समस्या : आम आदमी पार्टीचे आमदारांना निवेदन 

अरविंद मोटे


सोलापूर : राज्यातील नागरिकांचे कोरोनाच्या कालवधीतील चार महिन्यांचे 200 युनिट प्रति महिन्यापर्यंतची वीज बिलात माफी द्यावी. वाढीव वीज दर मागे घ्या व शिवसेनेच्या वचननाम्याप्रमाणे तीस टक्के दर कमी करण्याबाबत उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात हा विषय मांडा व निर्णय घ्यावा, यासाठी राज्यभरातील आमदारांना आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदने देण्यात येत आहेत. सोलापूरमध्येही आमदार प्रणिती शिंदे यांना निवेदन देण्यात आले. 

कोरोनाच्या महामारीदरम्यान राज्यातील जनतेची परिस्थिती फारच बिकट होती आणि आजपर्यंत यामधून बाहेर पडलेले नाहीत. असे असताना 1 एप्रिलपासून वीज दरवाढ करून जास्तीचे वीज देयके देण्यात आली आहेत. ती रद्द करून वीज बिल माफ करावे आणि शिवसेनेकडून जनतेला दिलेले वचन पाळावे, याबाबत राज्यात अनेक आंदोलन करून निवेदन दिले आहेत. वेळोवेळी मंत्रिमंडळात चर्चाही झाली, तसेच याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. परंतु आजपर्यंत सरकारने याबाबत निर्णय घेतलेला नाही. यासाठी आम आदमी पार्टीच्या वीने निवेदन आमदार प्रणिती शिंदे व आमदार विजयकुमार देशमुख यांना रविवारी देण्यात आले. 

याबाबतचे निवेदन आमदार सुभाष देशमुख यांना ई-मेलद्वारे पाठवण्यात आले. यावेळी आपचे शहराध्यक्ष मो. अस्लम शेख, पश्‍चिम महाराष्ट्र संघटन मंत्री सागर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे, माशाक कारभारी, नासिर मंगलगिरी, नरसिंग म्हेत्रे, इलियास शेख, अय्युब फुलमामडी, निहाल किरनळ्ळी, असद खतीब उपस्थित होते.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sand Mafia: वाळू माफियाविरोधात मोठी कारवाई लवकरच! मुख्यमंत्र्यांचे ठाम आश्वासन, काय म्हणाले?

Who Is Nitin Nabin: दिल्लीच्या राजकारणात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; भाजपचे सर्वात तरुण कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन कोण?

Lionel Messi: मेस्सीसाठी स्वागत, पण भारतीय खेळाडूंची ओळख पुसली! भारतीय फुटबॉलसाठी धक्कादायक क्षण

Solapur Crime:'साेलापुरात नवविवाहितेचा दहा लाख रुपयांसाठी छळ'; सात जणांवर गुन्हा दाखल, जाचहाट व छळ अन्..

छावणीच्या थकीत बिलाबाबत सरकारची ‘तारीख पे तारीख’; ‘इन्साफ कब मिलेगा’ म्हणत सत्ताधारीच अधिवेशनात आक्रमक !

SCROLL FOR NEXT