teachers-washim-a2_20180693429.jpg 
सोलापूर

कोरोना ड्यूटीतून सुटका होण्याची ठरली कार्यपध्दती ! शहरातील 163 शिक्षकांनी नाकारली कोरोना ड्यूटी

तात्या लांडगे

सोलापूर : शहरात 14 एप्रिलला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घराघरो सर्व्हे करण्यात आला. मात्र, तरीही रुग्ण व मृत्यूची संख्या कमी झाली नाही. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत शिक्षकांची मदत घेऊन त्यांना सर्व्हेच्या कामासाठी नियुक्‍त करण्याचा निर्णय झाला. प्रत्येकाला रोटेशन पध्दतीने 30 दिवसांची ड्यूटी बंधनकारक करण्यात आली. परंतु 40- 50 दिवसानंतरही कार्यमुक्‍ती मिळत नसल्याने आता कोरोना ड्यूटी दिलेल्या 633 पैकी 128 शिक्षकांनी ड्यूटी रद्दसाठी अर्ज केले आहेत. तर 35 जणांनी परस्पर दांडी मारली आहे.


कोरोनासंबंधी काम करण्यासाठी महापालिकेने प्राथमिक, माध्यमिक विभागाचे वेतन अधिक्षकांकडून शिक्षकांची शाळानिहाय माहिती घेतली. त्यानुसार शहरात खासगी प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांची संख्या एक हजार 694, माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षकांची संख्या एक हजार 927 आणि महापालिका शिक्षण मंडळातील शिक्षकांची संख्या 182 असल्याचे समोर आले. तीन हजार 803 शिक्षकांना किमान 30 दिवसांची ड्यूटी बंधनकारक करण्याचा आदेश महापालिका आयुक्‍तांनी काढले. तर वैद्यकीय तथा अन्य कारण सांगून ड्यूटी नाकारणाऱ्यांना विनावेतन सक्‍तीची रजा द्या, प्रसंगी त्यांच्यावर फौजदारी कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे बहुतांश शिक्षकांनी ड्यूटी करणेच पसंत केले. काही दिवसांपूर्वी प्रशासन अधिकारी कादर शेख यांनी 633 शिक्षकांना कार्यमुक्‍त करण्याचे आदेश काढले. मात्र, त्यातील काही शिक्षकांनी मुख्याध्यापकांच्या माध्यमातून ड्यूटी रद्दसाठी अर्ज केले असून काहींनी परस्पर दांडी मारली आहे. त्याबद्दल अंतिम आढावा घेऊन संबंधितांचे वेतन देऊ नये, असे पत्र आयुक्‍त पी. शिवशंकर हे वेतन अधिक्षकांना देणार आहेत.

आयुक्‍त स्तरावरुन होईल कारवाई
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निदेशानुसार प्रबिंधित क्षेत्रातील सर्वेक्षण, को-मॉर्बिड रुग्णांचे सर्वेक्षण, कोविड कंट्रोल रुम येथील कामकाज, कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगसाठी शिक्षकांची मदत घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वी 633 शिक्षकांना कार्यमुक्‍त केल्यानंतर नव्याने नियुक्‍त केलेल्यांपैकी बहुतांश शिक्षक हजर झाले नाहीत. तर 128 जणांनी ड्यूटी रद्दसाठी अर्ज केले आहेत. याची माहिती आयुक्‍तांना दिली आहे. 
- कादर शेख, प्रशासनाधिकारी, सोलापूर महापालिका


कार्यमुक्‍तीची अशी असेल कार्यपध्दती

  • एका शिक्षकास एकावेळी असेल किमान 30 दिवसांची कोरोना ड्यूटी
  • 30 दिवसांची ड्यूटी करणाऱ्या शिक्षकांना तीन दिवसांनंतर मिळेल कार्यमुक्‍ती
  • कार्यमुक्‍तीनंतर नव्याने आलेल्या शिक्षकांना पुढील 30 दिवस करावी लागेल ड्यूटी
  • नव्याने शिक्षक नियुक्‍त करताना 10 टक्‍के राखीव शिक्षक उपलब्ध ठेवले जातील
  • रोटेशन पध्दतीने शहरातील तीन हजार 803 शिक्षकांना करावी लागेल कोरोना ड्यूटी
  • कार्यमुक्‍त होणारे शिक्षक देतील नव्या शिक्षकांना तीन दिवसांचे प्रशिक्षण; त्यानंतर मिळतील कार्यमुक्‍तीचे आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Education Decision: राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! आरटीई प्रवेशाची अंतराची अट अखेर रद्द; पालकांना २५ मार्चपर्यंत अर्जाची संधी!

CJI SuryaKant यांचा मोठा निर्णय! कोर्टातील ‘काळे कोट’ संपणार? नावही बदलणार, मोठा बदल लवकरच!

Latest Marathi News Live Update : आज पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा

Beed Forest Department News: वन विभागात टक्केवारीचा खेळ; बोगस बिलांमुळे कोट्यवधींचा गैरव्यवहार?; सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा आरोप

Deepak Dalvi Death : मराठी अस्मितेचा ढाण्या वाघ हरपला! म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन; काही महिन्यांपूर्वीच शरद पवार, जयंत पाटलांनी घेतली होती भेट

SCROLL FOR NEXT