credai sakal
सोलापूर

क्रेडाई सोलापूरच्या वतीने प्रॉपर्टी एक्‍स्पोचे आयोजन

नॉर्थकोट मैदानावर शुक्रवारपासून होणार प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : क्रेडाई सोलापूरतर्फे प्लॉट, फ्लॅटस, रो- हाऊसचे प्रदर्शन १७ ते २० डिसेंबर दरम्यान नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर भरणार आहे. क्रेडाई सोलापूरचे अध्यक्ष शशिकांत जिद्दीमनी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या प्रदर्शनाचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता.१७) सकाळी साडेदहा वाजता महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते होणार आहे. मेटारोल इस्पात लि.चे संचालक आशिष भाला, स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे उपसरव्यवस्थापक महेश्वर प्रसाद, क्षेत्रिय व्यवस्थापक राजीव गुप्ता, मेटारोल स्टीलचे मार्केटिंग हेड संदीप देऊळगांवकर यांच्या प्रमुख उपस्थिती असणार आहे. अध्यक्षस्थानी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील फुरडे हे असणार आहेत. जिद्दीमनी म्हणाले, सदरील प्रदर्शन ता. १७ ते २० डिसेंबर दरम्यान दररोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे.

प्रदर्शनास भेट देणाऱ्या नागरिकांसाठी ता. १७ रोजी मोबाइल लसीकरण व्हॅनची व्यवसथा करण्यात आली आहे. रविवारी (ता. १९) रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस क्रेडाई सोलापूरचे उपाध्यक्ष अभय सुराणा, सचिव आनंद पाटील, अभिनव साळुंके, माजी अध्यक्ष किशोर चंडक आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT