भीमा-नीरा खोऱ्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नीरेवरील धरणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.
पंढरपूर (सोलापूर) : भीमा-नीरा खोऱ्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नीरेवरील धरणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. तसेच उजनी धरणाच्या (Ujani Dam) पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने भीमा नदीची (Bhima River) पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीमा व नीरा नदी (Neera River) काठच्या गावातील लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले (Provincial Officer Sachin Dhole) यांनी केले आहे. (Provincial Officer Sachin Dhole appealed to the villages along the river to be vigilant-ssd73)
गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने तसेच पूर परिस्थितीमुळे तालुक्यातील पिकांचे व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. संभाव्य आपत्तीवर वेळेत व प्रभावीपणे कार्यवाही पार पाडण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी समन्वय ठेवावा. वेळोवेळी पाणी पातळीत होत असलेल्या बदलांबाबत नदीकाठच्या गावांना अवगत करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. तसेच तात्पुरत्या निवाऱ्यासाठी सुरक्षित असलेल्या शासकीय इमारती, शाळा, मंदिरे या ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात औषधसाठा उपलब्ध ठेवावा. विद्युत पुरवठा सुरळीत व सुरक्षित राहील याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी, अशा सूचनाही प्रांताधिकारी ढोले यांनी या वेळी केल्या.
आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्तरीय समितीने सतर्क राहावे. शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणीच थांबावे. तसेच महसूल, पोलिस, लघू पाटबंधारे, जलसंधारण, पाणीपुरवठा, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, कृषी व ग्रामपंचायत विभागांनी एकमेकांच्या संपर्कात राहावे, अशा सूचनाही श्री. ढोले यांनी या वेळी दिल्या.
वीर धरणातून 800 क्युसेक विसर्ग
नातेपुते : वीर धरणातून शुक्रवारी सायंकाळी 5.50 वाजता नीरा नदीमध्ये 800 क्युसेक वेगाने विसर्ग सोडण्यास सुरू करण्यात आली आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार या विसर्गामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे नदी काठच्या सर्वांनी काळजी घ्यावी. नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये, असा सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.