bribe crime esakal
सोलापूर

Solapur Crime : २००० रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाला अँटीकरप्शन पोलिसांनी केली अटक

परीक्षा देऊन हवालदाराचे PSI झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाला दुचाकीस्वाराकडून 2000 रुपयांची लाच घेताना अँटीकरप्शन पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - दोन हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणात शहर वाहतूक शाखेतील पोलिस उपनिरीक्षकाला अँटीकरप्शन पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत बलभीम जाधव (वय 57, रा. सोलापूर) असे लाच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचे नाव आहे.

पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी सोलापूर शहर पोलीस दलात अनेक वर्ष अंमलदार म्हणून सेवा बजावली. त्यानंतर परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले. दोन-तीन दिवसांपूर्वी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी ट्रिपल सीट जाणाऱ्या वाहनचालकावर कारवाई केली होती. या कारवाईमधील वाहन सोडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी 2700 रुपये मागितले.

आज गुरुवारी (ता. 12) दुपारच्या सुमारास वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालय परिसरात जाधव यांनी तक्रारदाराकडून 2700 रुपये घेतले. यातील 700 रुपयांची ऑनलाईन पावती केली. राहिलेली दोन हजाराची रक्कम लाच स्वतःकडे ठेवली. लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक जाधव यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT