Pushing the police by refusing to take a swab in Akluj 
सोलापूर

अकलूजमध्ये स्वॅब घेण्यास मनाई करून पोलिसाला धक्काबुक्की 

शशीकांत कडबाने

अकलूज (सोलापूर) : कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या लोकाना विलगीकरण करण्यास व तपासणीसाठी स्वॅब घेण्यास मनाई करुन बेकायदेशीर जमाव जमवून चेथावणी देणे व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 23 जणांसह इतर अनोळखी आठ ते दहा जणांवर अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
अकलूज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकलूज येथील रामायण चौक परिसरात कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या अतीसंपर्कात आलेल्या काही व्यक्तींना विलगीकरण करणे व कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यासाठी वैद्यकीय अधिकारी गेले असता संपर्कातील व्यक्तींनी विरोध केला. आरोग्य विभागाने पोलिसांची मदत घेवून सदर व्यक्तींना अकलुज पोलिस चौकी येथे आणूण प्रशासनास सहकार्य करुन कायद्याचे पालन करा, असे समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु सदर व्यक्तींनी प्रशासनास सहकार्य करण्यास विरोध केला. त्या व्यक्तींचे नातेवाईक पोलिस चौकी येथे जमा होवून पोलिस व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालु लागले. संपर्कातील सात व्यक्तींना आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेतून जुनी पोलिस चौकी येथून घेवून जात असताना जोतीराम घाडगे व शुंभागी घाडगे यांनी जमलेल्या लोंकाना चिथावणी देत रुग्णवाहिका अडवण्यास सांगितले. जोतीराम घाडगे व शुंभागी घाडगे यांचे सांगण्यावरुन जमलेल्या लोकांनी रुग्णवाहिका आडवत सरकारी कामात अडथळा आणला. तर अविनाश बाळासाहेब गायकवाड यानी अकलूज पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्टेबल हरिशचंद्र दत्तात्रय पाटील यांना धक्काबुक्की केली. याबात हरिशचंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जोतीराम घाडगे, शुंभागी घाडगे, अरुणा सावंत, गौरी भोसले, दत्तात्रय भोसले, उषा भोसले, रियाण शेख, हिरालाल शेख, नंदा गायकवाड, अविनाश बाळासाहेब गायकवाड, अर्जुन शिंदे, वैशाली शिंदे, राजेश शिंदे, रजनी शिंदे, दिप्ती गुरव, राजेश शिंदे यांच्यासह कोरोना रुग्णांच्या संपर्कातील सात जणांसह अनोळखी आठ ते दहा लोकांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh Anti-India Rally : बांग्लादेशात कट्टरपंथियांकडून भारतविरोधी रॅली, प्रसिद्ध हिंदू मंदिरावर बंदी घालण्याची मागणी

Mumbai News: छटपूजेसाठी पालिका सज्ज! मुंबईत ६७ ठिकाणी नियोजन; विविध सुविधा उपलब्ध

CPR Kolhapur Crime : वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली बिर्याणी-नाश्ता! सीपीआर रुग्णालयात संशयितांना मिळते व्हीआयपी वागणूक?, सुरक्षा यंत्रणा मूग गिळून गप्प...

Latest Marathi News Live Update : नाशिक मुंबई महामार्गावरील इंदिरानगर बोगदा सोमवारपासून ९ महिन्यांसाठी राहणार बंद

“सलमानसोबत पुन्हा काम नाही!” ‘अंतिम’च्या सेटवर झाला होता वाद! महेश मांजरेकरांनी उघड केली सलमान खानची खरी बाजू!

SCROLL FOR NEXT