corona 
सोलापूर

अरे व्वा ! क्‍वारंन्टाईनमध्ये तो टेरेसवर झोपला म्हणूनच... 

तात्या लांडगे

सोलापूर : मुंबईत पोलिस बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्याला त्रास होऊ लागल्याने त्याच्या हातावर डॉक्‍टरांनी 14 दिवसांसाठी होम क्‍वारंटाईनचा शिक्‍का मारला. मात्र, काही दिवसांनी त्रास होऊ लागला अन्‌ त्याला कुटुंबाची ओढ लागली. तो 15 एप्रिलला सोलापुरात आला, मात्र कोरोनाच्या भितीने तो कुटूंबापासून दूर राहिला. घरावरील टेरेसवर झोपला. त्रास वाढल्याने तो स्वत:हून श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाला. आता तो कोरोनाबाधित रुग्ण म्हणून जाहीर झाला आहे. 

कोरोना या विषाणूपासून नागरिक सुरक्षित राहावेत, यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस रस्त्यांवर पहारा देत आहेत. बेशिस्त नागरिकांसह विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. नागरिकांना वारंवार आवाहन करणे, रस्त्यांवरुन ये- जा करणाऱ्यांना हटकून त्यांची विचारपूस करणे अशी जोखमीची कामे त्यांना सद्यस्थितीत करावी लागत आहेत. अशा परिस्थितीत मुंबईत पोलिस बंदोबस्तासाठी असलेल्या सोलापुरातील एका पोलिस कर्मचाऱ्याला खोकला, ताप, सर्दी झाली. त्यानंतर तो त्याठिकाणच्या दवाखान्यात गेला, मात्र सुरवातीच्या रिपोर्टमध्ये काहीच आढळले नाही. त्यावेळी डॉक्‍टरांनी त्याच्या हातावर होम क्‍वारंटाईनचा शिक्‍का मारला. त्याचा त्रास वाढल्याने कुटुंबापासून दूर असलेल्या त्या पोलिस कर्मचाऱ्याला कुटूंबाची ओढ लागली आणि त्याने अखेर सोलापूर गाठले. 


पोलिस कर्मचारी असल्याने सहजपणे आला 
मुंबईत पोलिस कर्मचारी असल्याने त्याच्याकडे ओळखपत्र होते. ज्या-ज्या ठिकाणी त्याला पोलिसांनी अडवले, त्यावेळी त्याने पोलिस असल्याचे ओळखपत्र दाखवले. त्यामुळे तो सहजपणे सोलापुरात येऊ शकला. सोलापुरात घरी आल्यानंतर त्याने स्वत:ला त्रास होत असल्याने कुटूंबातील सदस्यांपासून दूर राहणे पसंत केले. घराच्या टेरेसवर असलेल्या छोट्या खोलीत त्याने दोन दिवस काढले. त्रास वाढल्याने तो स्वत:हून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. दरम्यान, शुक्रवारी (ता. 17) तो कोरोनाबाधित असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

संसर्ग रोखण्यासाठी तीन पायऱ्या खूप महत्त्वाच्या 
कोरोनाच्या भितीने अनेकजण माहिती लपवत असल्यानेच संसर्गाचा धोका वाढू लागला आहे. कोरोनाबाधित रुग्ण, त्याच्या संपर्कातील व्यक्‍ती आणि दुसऱ्या व्यक्‍तींच्या संपर्कातील व्यक्‍ती, अशा तीन पायऱ्यांवरील व्यक्‍तींनी स्वत:हून वैद्यकीय तपासणी करुन घेण्याची फार मोठी गरज आहे. जेणेकरुन कोरोनाच्या विषाणूची साखळी निश्‍चितपणे खंडीत होऊ शकते. मुंबईहून सोलापुरात आलेल्या त्या व्यक्‍तीने खबरदारी घेत तो स्वत:हून कुटूंबातील सदस्यांपासून दूर राहिला. घरावरील टेरेसवर असलेल्या लहान खोलीत तो झोपला. त्यामुळे त्याचे कौतूकच असल्याचे पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: मोदी सरकारमधील कोणत्या मंत्र्याने सर्वात वाईट कामगिरी केली? ५ मंत्र्यांची यादी तयार; खुद्द पंतप्रधानांनीच घेतली बैठक

शुभमन गिलचा IPL 2026 मधील बेस्ट कॅच... शिवम दुबेला माघारी पाठवून फिरवली मॅच Video Viral

Latest Marathi News Live Update : फोंडा घाटातून वाहतुकीवरील निर्बंध दहा जूनपर्यंत कायम

आधी घर आणि आता अलिशान गाडी! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याने खरेदी केली नवी कोरी कार, किंमत ऐकून थक्क व्हाल

Solapur OBC Hostel News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! वसतिगृह प्रवेश नियमित, ५१०० रुपये निर्वाह भत्ता मंजूर, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

SCROLL FOR NEXT