Quarantine of workers on boarmachin in Solapur district 
सोलापूर

बोअरच्या गाडीवरील कामगारांचे शेतातच क्वारंटाइन

मोहन काळे

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा लॉकडाउन केल्याचा फटका शेतात बोअर घेण्याच्या व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे बोअरच्या गाडीवर काम करणाऱ्या कामगारांना शेतातच क्वारंटाइन व्हावे लागले आहे. या गाड्या जागेवरच थांबल्यामुळे दररोज लाखो रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे. 
कोरडवाहू जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात दिवाळीनंतर लगेचच शेतात बोअर घेण्याचा हंगाम सुरू होत असतो. दरवर्षी शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न भेडसावत असल्यामुळे शेतात बोअर घेण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतात एक बोअर घेण्यासाठी किमान 50 हजार रुपये खर्च येतो. एक गाडी दिवसातून किमान तीन बोअर घेते. त्यामुळे एका गाडीचे दररोज किमान एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान होत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात 10 ते 15 बोअरच्या गाड्या परराज्यातून आलेल्या आहेत. या गाड्यांच्या मागे अनेकांचा उदरनिर्वाह चालत असतो. शेतात पाणी पाहणारा पानवडी, पॉइंट पाहणारा एजंट, गाडी मालक, चालक व इतर 10 ते 15 कामगारांचा उदरनिर्वाह बोअर घेणाऱ्या एका गाडीवर अवलंबून आहे. जिल्ह्यात सध्या संचारबंदी असल्यामुळे जिल्ह्यातील बोअर घेणाऱ्या गाड्या शेतातच थांबल्या आहेत. त्यामुळे या व्यवसायातून दररोज होणारी लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. 19 मार्चपासून गाड्या जागेवरच थांबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी व बोअर व्यावसायिक अनेक अडचणींचा सामना करू लागले आहेत. 

बोअरच्या गाड्या थांबून 
आपल्या जीवापेक्षा कोणताच धंदा मोठा नाही. कोरोना रोग आटोक्‍यात येण्यासाठी आम्ही जागेवरच बोअरच्या गाड्या थांबून प्रशासनाला सहकार्य करत आहोत. परराज्यातील कामगार बोअरच्या गाड्यांवर काम करत असल्यामुळे आम्ही त्यांची फार काळजी घेत आहोत. 
- वसंत आदमिले, बोअर गाडी एजंट, रोपळे बुद्रूक, ता. पंढरपूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT