shiddheswar express 
सोलापूर

'सिध्देश्‍वर एक्‍स्प्रेस'च्या तांत्रिक तपासणीवर प्रश्‍नचिन्ह...नक्‍की वाचा 

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर- मुंबई सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेसला दीड महिन्यापूर्वी जुना रेक बदलून नवा एलएचबी रेक जोडण्यात आला. सुरक्षितता म्हणून सोलापूर व मुंबई स्थानकांवर या एक्‍स्प्रेसची तांत्रिक तपासणी केली जाते. तरीही गुरुवारी (ता. 6) या एक्‍स्प्रेसच्या जनरल कोचचा पाइप तुटल्याने तांत्रिक तपासणीवर प्रश्‍चचिन्ह निर्माण झाले आहे. पुण्यात तात्पुरती दुरुस्ती करून गाडी पुढे रवाना झाली आणि तब्बल दीड तास विलंबाने ही गाडी सोलापुरात दाखल झाली. 

प्रवाशांची मोठी गैरसोय झाली

सोलापुरातून रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी मुंबईला जाणारी आणि मुंबईहून रात्री 10.40 वाजता सोलापूरकडे निघणारी सोलापूर-मुंबई सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेसला प्रवाशांची मोठी गर्दी असते. अनेक नोकरदार, राजकीय व्यक्‍ती या गाडीतून प्रवास करतात. दरम्यान, सोलापुरातील आरोग्य तपासणी शिबिराच्या निमित्ताने बुधवारी (ता. 5) राज्याच्या आरोग्य शिक्षण व संशोधन विभागाचे अतिरिक्‍त संचालक तात्याराव लहाने सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेसने येत होते. तर मुंबईतील काम आटोपून आमदार सचिन कल्याणशेट्टीही याच एक्‍स्प्रेसमधून येत होते. या एक्‍स्प्रेसला नवा एलएचबी रेक बसविल्याचा आनंद व्यक्‍त करीत असतानाच पुण्याजवळ गाडीचा वेग कमी झाला. काही वेळातच सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेस थांबली. प्रवाशांना काहीच समजले नाही, परंतु एक्‍स्प्रेसच्या जनरल कोचचा पाइप तुटल्याने पुण्यात त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर गाडीचा वेग ताशी 110 किलोमीटरवरून 80 किलोमीटर करण्यात आला. त्यामुळे गुरुवारी सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेसला सोलापुरात पोचण्यास तब्बल दीड तासांचा विलंब झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आणि त्यांचे दिवसभराचे नियोजन विस्कळित झाले. 

जनरल डब्याचा तुटला होता पाईप 
मुंबईहून बुधवारी रात्री 10.40 वाजता निघालेल्या सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेसचा पुण्याजवळ तांत्रिक बिघाड झाला. जनरल कोचचा पाइप तुटल्याने गाडीचा वेग कमी करून सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेस पुण्याहून सोलापूरकडे रवाना करण्यात आली. त्यामुळे रेल्वेगाडीला नियोजित वेळेनुसार पोचण्यास थोडासा विलंब झाला. 
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपने राष्ट्रीय पातळीवर केली नियुक्ती, सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

Fifa World Cup विजेत्या देशाचा क्रिकेटच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाच्या महासत्तेला धक्का; स्पेनचा २१-० हा विक्रम नेमका आहे तरी काय?

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Marathi News Live Updates : वाराणसी विमानतळावर विमानातील प्रवाशाकडे आढळले शस्त्र

घरी नणंदेसोबत कशी वागते करीना कपूर? सैफ अली खानच्या बहिणीने सांगितली आतली गोष्ट; म्हणाली- ती नाटकी...

SCROLL FOR NEXT