Hanmantu Kshirsagar 
सोलापूर

"माझा हनुमंत कुठे आहे?' म्हाताऱ्या आईच्या प्रश्‍नाने हेलावली कुटुंबीयांची मने !

वेणुगोपाळ गाडी

सोलापूर : मार्कंडेय रुग्णालयात झालेल्या स्फोटामुळे आपला मुलगा हनुमंत दगावला, हे अद्यापही रुग्णालयात उपचार घेणाऱ्या हनुमंतची वृद्ध आई अरुणा जालिंदर क्षीरसागर यांना माहीत नाही. कुटुंबीयांनी हनुमंत गेल्याची बाब लपूवन ठेवली, मात्र मातेकडून सारखी "हनुमंत कुठे आहे?' अशी विचारणा होत असल्याने क्षीरसागर कुटुंबीयांची मने हेलावून गेली. 

क्षीरसागर कुटुंबीय बाळे येथे राहतात. या कुटुंबाचा आधारस्तंभ अरुणा या बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास न्यूमोनियाच्या आजारामुळे श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या. रात्री साडेदहाच्या सुमारास हनुमंत यांचा भाऊ मदन, रवींद्र व बहीण अंजना हे तिघेही आईसोबत होते. तेवढ्यात हनुमंत यांनी आईसाठी डबा आणला. साडेदहाच्या सुमारास मदन तेथून निघाले आणि हनुमंत, रवींद्र, अंजना ही भावंडे रुग्णालयाच्या आवारात एका शेडखाली जेवायला बसले. त्यांचे जेवण सुरू असतानाच अकरा वाजण्याच्या सुमारास या शेडजवळील ऑक्‍सिजन टाकीचा स्फोट झाला. यामध्ये क्षीरसागर कुटुंबीय तसेच अन्य लोक स्फोटाने उडालेल्या पावडरने माखले गेले. पावडरची धूळ उडत असल्याने कोणाला काय झाले हे समजले नाही. काही वेळाने हनुमंत हे बेशुद्धावस्थेत आढळले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू झाले खरे, मात्र दुर्दैवाने पहाटे अडीच वाजता ते मरण पावले. 

रुग्णालयाच्या बेफिकिरीमुळे हनुमंत मरण पावले, असा आरोप गुरुवारी सकाळी करीत क्षीरसागर कुटुंबीयांनी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यानंतर दुपारी हनुमंत यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयाला पाठविण्यात आला. दरम्यान, रुग्णालयाचे संचालक व नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी क्षीरसागर कुटुंबीयांची समजूत काढल्यानंतर त्यांनी मृतदेह सायंकाळी सात वाजता ताब्यात घेतला आणि साडेनऊच्या सुमारास अंत्यसंस्कार केले. 

हनुमंत मरण पावल्याबद्दल क्षीरसागर कुटुंबीयांनी अद्याप त्यांच्या आईला सांगितले नाही. हनुंमत गेल्याचे ऐकल्यावर आईला धक्का बसणार, अशी भीती त्यांना सतावत आहे. दरम्यान, गुरुवारी व शुक्रवारीदेखील आईने हनुमंत कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावर मदन यांनी तो गावाला गेला, असे सांगून मृत्यूची वार्ता जाणीवपूर्वक लपवून ठेवली आहे. एकंदर, क्षीरसागर कुटुंबीयांची घालमेल होत असून, त्यांचे मन हेलावून गेले आहे. हनुमंत यांच्या मागे पत्नी सोनाली तसेच पाच व सात वर्षांची दोन मुले आहेत. 

हनुमंत गेल्याचे समजल्यावर मानसिक धक्का बसेल या भीतीने आम्ही आईला अद्याप सांगितले नाही. सध्या तो गावी गेला, असे आम्ही खोटे सांगितले आहे. दोन-चार दिवसांनी आईला सत्य सांगू. हनुमंत यांची पत्नी अपंग असल्याने रुग्णालयाने तिला नुकसान भरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे. 
- मदन क्षीरसागर, 
हनुमंत यांचा भाऊ 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT