Quota for the state ended Maize shopping center closed in Solapur district 
सोलापूर

राज्यासाठीचा कोटा संपला; सोलापूर जिल्ह्यातील मका खरेदी केंद्रे बंद 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : केंद्र सरकारने राज्यासाठी मका खरेदीसाठी दिलेला कोटा संपल्याने सोलापूर जिल्ह्यातील मका खरेदी केंद्रे आजपासून बंद कऱण्यात आली आहेत. यात पंढरपूर येथे सुरू असलेले मका खरेदी केंद्रही बंद झाल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मका खरेदी केंद्रे बंद झाल्याचे कळताच खासगी व्यापाऱ्यांनी मक्‍याचा दर पाडून खरेदी सुरू केली आहे. 
यावर्षी सोलापूर जिल्ह्यात मक्‍याचे जास्त उत्पादन झाले आहे. मक्‍याला हमीभाव मिळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मका खरेदी केंद्रे सुरू केली होती. परंतु, लोकडॉऊनने बारदाना मिळाला नसल्याने खरेदी रखडली होती. 
शेवटच्या टप्प्यात बारदाना उपलब्ध झाल्यानंतर मक्‍याची खरेदी सुरू केली होती. परंतु, दोन दिवसांतच खरेदी केंद्रे बंद कग़ण्यात आल्याने हजारो क्विंटल मका खरेदीविना पडून आहे. शासकीय हमीभावाने मक्‍याची खरेदी बंद झाल्याने आता खासगी व्यापाऱ्यांनी कमी दरात खरेदी सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे 300 ते 400 रुपयांचा फटका बसणार आहे. 
पंढरपूर येथील केंद्रात पंढरपूर व सांगोला तालुक्‍यातील सुमारे 550 शेतकऱ्यांनी 22 हजार क्विंटल मक्‍याची नोंदणी केली होती. दोन दिवसांत फक्त 67 शेतकऱ्यांची दोन हजार 189 क्विंटल मक्‍याची एक हजार 760 रुपये हमीभावाने खरेदी करण्यात आली आहे. दरम्यान, येथील केंद्रात खरेदीअभावी अजून एक हजार 300 क्विंल मका पडून आहे. 
तर शेतकऱ्यांच्या घरात आणखी जवळपास 20 हजारांहून अधिक क्विंटल मका पडून आहे. या मक्‍याची खरेदी कोण करणार, असा प्रश्‍नही यानिमित्त समोर आला आहे. केंद्राने राज्याला दोन लाख 50 हजार क्विंटल मका खरेदीचा कोटा दिला होता. कोरोनाने सोलापूर जिल्ह्यातील केंद्रांना उशिरा बारदाना उपलब्ध झाला होता. त्यामुळे राज्यातील अन्य केंद्रांत मक्‍याची जास्त खरेदी झाली. त्याचा परिणाम सोलापूर जिल्ह्यातील कोट्यावर झाला. त्यामुळे सोमवारपासून मका खरेदी केंद्रे बंद कऱण्याचे आदेश मिळाल्यानंतर मका खरेदी बंद करण्यात आल्याचे खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शांतीनाथ बागल यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT