Fraud Gallery
सोलापूर

कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली तरुणाची दीड लाखाची फसवणूक !

कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली तरुणाची दीड लाखाची फसवणूक !

दत्तात्रय खंडागळे

व्यवसायासाठी 25 लाख रुपयांचे प्रोजेक्‍ट लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणाला तब्बल एक लाख 44 हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे.

सांगोला (सोलापूर) : व्यवसायासाठी 25 लाख रुपयांचे प्रोजेक्‍ट लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने तरुणाला तब्बल एक लाख 44 हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. तरुणाकडून ऑनलाइन पद्धतीने पैसे ट्रान्स्फर करून घेऊन संशयिताने कर्ज न देता त्याची फसवणूक (Fraud) केल्याचे लक्षात आल्यानंतर, अखेर सांगोला पोलिस ठाण्यात (Sangola Police Station) याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत राहुल सुभाष घाडगे (रा. महादेव गल्ली, सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवराज महारुद्र स्वामी (रा. लक्ष्मीदहीवडी, ता. मंगळवेढा) याच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.

सांगोला शहरातील महादेव गल्ली येथील राहुल सुभाष घाडगे यांना त्यांचा मित्र ज्ञानेश्वर ऊर्फ बबलू ढोले याने शिवराज महारुद्र स्वामी याच्यासोबत ओळख करून देत तो प्रोजेक्‍ट लोन करून देतो असे सांगितले होते. त्यानंतर 2019 व्यवसायासाठी पैशाची गरज असल्याने राहुल घाडगे यांनी शिवराज स्वामी याची भेट घेतली. या वेळी शिवराज स्वामी याने राहुल घाडगे यांना 25 लाख रुपयांचे प्रोजेक्‍ट लोन करून देतो, त्यासाठी दोन लाख रुपये कमिशन म्हणून अधिकाऱ्यांना द्यावे लागतील, असे सांगितले.

राहुल घाडगे यांनी 25 सप्टेंबर ते 23 ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत एक लाख 44 हजार रुपये शिवराज स्वामी यांच्या बॅंक आँफ इंडिया, शाखा लक्ष्मीदहिवडी येथील खात्यावर भरले. या वेळी स्वामी यांनी फाईल तयार होण्यास तीन ते चार महिने लागतील, असे सांगितले. त्यानंतर राहुल घाडगे यांनी वेळोवेळी लोनबाबत विचारणा केली असता, काहीतरी कारण सांगून स्वामी यांनी टाळाटाळ केली. कर्ज मंजूर होत नसल्याने घाडगे यांनी दिलेले पैसे परत मागितले असता शिवराज स्वामी हा पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने आपली एक लाख 44 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घाडगे यांची खात्री झाली. त्यानंतर त्यांनी सांगोला पोलिस ठाण्यात शिवराज स्वामी याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT